Laal Singh Chaddha Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित अन् बहु प्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बिग बजेट चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ या नवीन चित्रपटातून पुनरागमन करत आहे. मात्र, या दरम्यान त्याच्या या चित्रपटावर जोरदार टीका देखील होत आहे. असे, असूनही आमिर खानच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.


‘लाल सिंह चड्ढा’च्या आगाऊ बुकिंगवरून या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल याची कल्पना आली होती. आमिर खानचे चाहते त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट पाहण्यात प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत. या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने 11 कोटींचा आकडा ओलांडला असून, पिंकविलाच्या रिपोर्टनुसार पहिल्याच दिवशी जवळपास 10.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.


आधी चित्रपट बघा : आमिर खान


या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आमिर खानच्या या चित्रपटाला मोठा विरोधही होत आहे. याबाबत आमिर खाननेही आपले मत मांडले आहे. आमिर खानने या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना एकदा 'लाल सिंग चड्ढा' पाहण्यास सांगितले आहे. हा चित्रपट आमिर खानचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्यासाठी आमिर आणि करीनाने खूप मेहनत घेतली आहे.


‘लाल सिंह चड्ढा’ हा ‘फॉरेस्ट गंप’ या सहा ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यांनी मूळ चित्रपट पाहिला असेल, त्यांना हा चित्रपट देखील आवडेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला खूप विरोध झाला असला, तरी आमिर आणी करीनाचे चाहते ‘लाल सिंह चड्ढा’ आवर्जून पाहत आहेत. अनेक विरोधानंतर अखेर हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात पोहोचले आहेत.


रक्षाबंधनशी बॉक्स ऑफिस टक्कर


'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' हे दोन्ही बिग बजेट चित्रपट चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच जोरदार चर्चा रंगली होती. काही लोक 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याची मागणी करत असताना, अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायचा होता, हे त्याच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून लक्षात येते. या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर, काही भागांत अजूनही या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे.


वाचा इतर बातम्या: