Ira Khan: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानने (Ira Khan) नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केलं आहे. उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झाल्यानंतर नुपूर आणि आयरा यांचे मुंबईत भव्य रिसेप्शन पार पडले. आता  आयराने तिच्या प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील आयराच्या एका फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमुळे आता अनेक नेटकरी आयराला ट्रोल करत आहेत. 


आयरानं शेअर केले फोटो (Ira Khan Pre Wedding Pics)


आयराने तिचे काही प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो शेअर केले आहेत.  यामधील एका फोटोमध्ये आयरानं डोळ्यांवर आय मास्क लावलेला दिसत आहे. तर एका फोटोंमध्ये आयराची आई आणि नुपूर शिखरेची आई या दिसत आहे. पण आयरानं शेअर केलेल्या एका फोटोमुळे नेटकरी आयरावर भडकले आहेत.  


नेटकऱ्यांनी का केलं ट्रोल?


आयरानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये सिगारेट दिसत आहे. आयराच्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी आयराला ट्रोल केलं आहे. या एका यूजरने कमेंट केली, 'हा फोटो चांगला नाही', तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, "आमिर खानची मुलगी असूनही तू असे फोटो शेअर करत आहेस?"






आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा या उदयपूरमध्ये पार पडला. दोघांनी खिश्चन पद्धतीनं लग्न केलं.त्याआधी मेहंदी, संगीत समारंभ आणि पायजमा पार्टी देखील पार पडली. या जोडप्याने 3 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते. त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.


आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.तसेच आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, जया बच्चन, श्वेता बच्चन, सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी,रेखा, अनिल कपूर या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. या सेलिब्रिटींचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Shah Rukh Khan: रुसवा फुगवा विसरून किंग शाहरुख पत्नीसह आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला पोहोचला; हटके एन्ट्रीने सर्वांच्या नजरा खिळल्या