Kamal Haasan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांची बर्थ-डे पार्टी चेन्नईमध्ये (Chennai) पार पडली. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता नुकताच कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील आमिर खानचा (Aamir Khan) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Continues below advertisement


दोन गजनी एकाच फ्रेममध्ये


नुकताच रवी के चंद्रन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सूर्या हा व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे तर आमिर हा ब्राऊन आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,"कमल हासन यांच्या बर्थ-डे पार्टीमध्ये , दोन गजनी एकाच फ्रेममध्ये". 2005 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ भाषेत रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेता सूर्यानं प्रमुख भूमिका साकारली तर  2008 मध्ये गजनी हा चित्रपट  हिंदी भाषेत रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खाननं प्रमुख भूमिका साकारली.  






राधाकृष्णन पार्थिबन यांनी देखील कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, काल कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मी आमिर खानला भेटलो."






आमिरचे आगामी चित्रपट


आमिरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या सितारे जमीन पर या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच आमिरचा  'लाहोर- 1947'   हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती  आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी करणार आहे.


कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्तानं ठग लाईफ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.


संबंधित बातम्या:


Aamir Khan: आमिर खान मुंबई सोडून 'या' शहरात होणार शिफ्ट; 'मिस्टर परफेक्शनिस्ट' का घेतोय मायानगरी सोडण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण