Laal Singh Chaddha Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. या विरोधाचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही झाला आहे. पहिल्यादिवसापासून या चित्रपटाची कमाई घसरतच चालली आहे. मात्र, रविवारी (14 ऑगस्ट) या आकड्यांत काहीशी वाढ झालेली दिसली. कमाईचा आकडा काही अंशी वाढलेला असला, तरी आलेख मात्र घसरताच आहे. रिलीजपूर्वी आणि नंतर रिलीज झाल्यानंतर सतत बहिष्काराच्या मागणीमुळे चर्चेत असलेला हा चित्रपट कमाईच्या बाबतीत काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही.


गेल्या तीन दिवसांपासून आमिर खानच्या या चित्रपटाची कमाई सातत्याने घटत होती. अशा परिस्थितीत आमिर आणि त्याच्या चित्रपटासाठी रविवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला. रिलीजच्या चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, आमिर खानच्या या चित्रपटाने सुट्टीचा फायदा घेत देशभरात सुमारे 10 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आतापर्यंत देशभरात एकूण 37.96 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.



वर्ल्ड वाईड कलेक्शनवरही परिणाम


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला विरोध होत असताना, प्रदर्शित झाल्यानंतरही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्यासारखे अनेक गंभीर आरोपही या चित्रपटावर करण्यात आले आहेत. या सगळ्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही होताना दिसत आहे. केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही तर, आमिर खानच्या या चित्रपटाची वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवरही खूपच कमी कमाई होत आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतो का, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.


'फॉरेस्ट गंप’चा रिमेक


'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. त्यामुळे 'फॉरेस्ट गंप' आणि 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातील काही दृश्यांचा व्हिडीओ 'द अकॅडमी' (The Academy) या ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाला ऑस्करमध्ये 13 नामांकन मिळाली होती. तर, सहा ऑस्कर पुरस्कारवर या चित्रपटाने आपली नाव कोरले होते. आमिरचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला खूप विरोध झाला असला, तरी आमिर आणि करीनाचे चाहते ‘लाल सिंह चड्ढा’ आवर्जून पाहत आहेत. अनेक विरोधानंतर अखेर हा चित्रपट पाहण्यासाठी काही लोक चित्रपटगृहात पोहोचले होते.


वाचा इतर बातम्या: