Shantanu Rode : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा झाली आहे. यात 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Shantanu Rode) यांनी शंतनु रोडेला एक खास पत्र लिहिलं आहे. 


'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शंतनु रोडेने सांभाळली आहे. आता या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र लिहित शंतनुला शुभेच्छा दिल्या आहेत. मुनगंटीवारांनी पत्रात लिहिलं आहे, आपण लेखन आणि दिग्दर्शित केलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी सिनेमाला 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याचे वृत्त वाचले, अतिशय आनंद झाला".


मुनगंटीवारांनी पुढे लिहिले आहे, आपल्या सुयशाने अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. आपले हे यश चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेष गौरवास्पद आहे. नवरनाव या चंद्रपूर जिल्ह्यातील नाट्य पंढरीचे आपल्यावर असलेले संस्कार व आपले परिश्रम, जिद्द यातून हे यश साकारले आहे. नवरगाव ते मुंबई हा आपला संघर्षमय प्रवास थक्क करणारा असून या क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे". 






शंतनु रोडेने मानले प्रेक्षकांचे आभार
  
शंतनु रोडेने सुधीर मुनगंटीवार यांचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे,"खूप साऱ्या शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वांचे मनापासून आभार. आज मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेबांचे पत्र मिळाले. खूप खूप धन्यवाद सर.छान काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहू".


संबंधित बातम्या


National Film Awards 2022 : 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा; राहुल देशपांडे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक


68th National Film Awards Live updates : 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, 68 वा चित्रपट पुरस्कार जाहीर, राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तर किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार