AR Rahman Divorce : प्रसिद्ध भारतीय संगीतकार आर रहमान आणि सायरा बानो यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह यांनी एबीपी न्यूजशी खास संवाद साधला. वकील वंदना यांनी सांगितलं की, सामान्य लोकांप्रमाणेच प्रसिद्ध लोकांच्या घटस्फोटाची कारणेही कमी-अधिक प्रमाणात सारखीच असतात. एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या विभक्त होण्याचं कारण विचारलं असता त्यांनी गोपनीयता बाळगणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी याबाबत काही संकेत दिले आहेत.


एआर रहमानच्या घटस्फोटाचं मोहिनी डेशी कनेक्शन? 


वंदना यांनी सांगितलं की, ए आर रहमान आणि सायरा बानो यांचा अजून घटस्फोट झालेला नाही. पण, दोघांमधील मतभेद सोडवता न आल्याने त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. वंदना शाह म्हणाल्या की, आम्ही फक्त आशा करू शकतो की, दोघांमधील सर्व मतभेद मिटतील आणि ते पुन्हा एकत्र येतील. एआर रहमानने पत्नी सायरा बानूपासून विभक्त होणार असल्याची घोषणा सोशल मीडिया पोस्टद्वारे करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.


वकिल वंदना शाह सांगितलं सत्य


एआर रहमान आणि सायरा बानो यांच्यातील मतभेदामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप या जोडप्याला घटस्फोट झालेला नाही. पण, घटस्फोट झाल्यासे एआर रहमानला पत्नी सायराला पोटगी द्यावी लागेल. घटस्फोटानंतर पत्नीला मिळणारी आर्थिक भरपाई म्हणजे पोटगी अनेक घटकांवर अवलंबून आहे. एआर रहमान घटस्फोटानंतर सायरा बानोला किती पोटगी देणार हा ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.


गिटारिस्ट मोहिनी डेची घटस्फोटाची घोषणा


एआर रहमानने विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर, त्याच्या म्युझिक टीममधील गिटारिस्ट मोहिनी डे, हिनदेखील तिच्या पतीपासून वेगळं झाल्याची पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी एआर रहमान आणि मोहिनी डे या दोघांच्या घटस्फोटामधील कनेक्शन शोधण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी दोघांचं नातं जोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वंदना यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हणत या चर्चा फेटाळल्या आहेत.


घटस्फोट घेण्याच्या वाढत्या ट्रेंडचं कारण काय?


बॉलीवूड जोडप्यांमध्ये दीर्घकाळ वेळ घालवल्यानंतर वंदना शाह यांनीही घटस्फोट घेण्याच्या वाढत्या ट्रेंडबद्दल सांगितलं. वंदना यांनी सांगितलं की, विवाहबाह्य संबंधांशिवाय एकमेकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण न करणे, वर्षानुवर्षे स्वतःची ओळख आणि अस्तित्व शोधणे, हे देखील घटस्फोट होण्यास कारणीभूत ठरत आहेत. सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यांच्यातील घटस्फोटाची कारणे साधारणपणे सारखीच असतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


AR Rahman Guitarist Divorce : एआर रेहमानच्या गिटारिस्टनेही नवऱ्यापासून घेतला घटस्फोट, सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा