Emmy Awards 2022 Nominations List : 74 व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे (Emmy Awards 2022) नामांकन आज (मंगळवारी) जाहीर झाले आहेत. यात 'सक्सेशन' या वेबसीरिजला 25 नामांकन मिळाले आहेत. तर स्क्विड गेम: द चॅलेंज' (Squid Game: The Challenge) या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठीदेखील एक आनंदाची बातमी आहे. या वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट नाट्य या विभागासह आणखी 13 नामांकन जाहीर झाले आहेत. 

74 वा एमी पुरस्कार सोहळा 12 सप्टेंबरला लॉस एंजिलिसमध्ये पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'सक्सेशन' या वेबसीरिजला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. तर सेवरेंस, स्ट्रेंजर थिंग्स, बॅरी यूफोरियो, टेड लासोसारख्या अनेक लोकप्रिय वेबसीरिजचादेखील या यादीत समावेश आहे. 

एमी पुरस्कार सोहळ्यात स्क्विड गेमचा दबदबा

'स्क्विड गेम: द चॅलेंज' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांमध्ये या वेबसीरिजची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. ही कोरिअन वेबसीरिज आता एमी पुरस्कारांच्या यादीत सामिल झाली आहे. नेटफ्लिक्सवरील ही सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. नऊ भागांची ही वेबसीरिज 12 सप्टेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रिलीजच्या चार आठवड्यातच ा वेबसीरिजला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहे. 

वेबसीरिजच्या नामांकनाची यादी

सर्वोत्कृष्ट नाट्य

बेटर कॉल साउलयूफोरियाओजार्कसेवरेंसस्क्विड गेमस्ट्रेजर थिंग्ससक्सेशनयेलोजॅकेट्स

सर्वोत्कृष्ट विनोदी वेबसीरिज

एबॉट एलिमेंट्ररीबॅरीकर्ब योर एंथुसियाज्महॅक्सद मार्वलस मिसेज मिशेलओनली मर्डर्स इन द बिल्डिंगटेड लॉसोव्हॉट वी डू इन द शॅडोज

एंथोलॉजी सीरिज

डोपसिकद डॅॉपआऊटइनवेंटिंग अन्नापाम अॅन्ड टॉमीद व्हाइट लोट्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता

जेसन बॅटमॅन (ओजार्क)ब्रिटन कॉक्स (सक्सेश)ली जुंग जे (स्क्विड गेम)बॉब ओडेवक्रिक (बेटर कॉल सॉल)एड्म स्कॉट (सेवरेंस)जेमी स्ट्रॉन्ग (सक्सेशन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

जॉडी कॉमर (किलिंग ईव)लॉरा लिनी (ओजार्क)मेलानी लिन्स्की (यलो जॅकेट)सॅंड्रा ओह (किलिंग ईव)रीस विदरस्पून (द मार्निंग शो)जॅंडेया (यूफॉरिया) 

संबंधित बातम्या

Dr. Arora : मनोरंजनच नव्हे, समाज प्रबोधनही! लैंगिक समस्यांवर गंभीर भाष्य करणारी 'डॉ. अरोरा' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Kaali : 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी 'काली' दिग्दर्शिकेवर साधला निशाणा; म्हणाले, 'या वेड्या लोकांना...'