FIR Against 72 Hoorain Director And Producers : '72 हुरैन' (72 Hoorain) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मोठ्या प्रमाणात या सिनेमावर टीका होत आहे. 28 जूनला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून येत्या 7 जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) '72 हुरैन'च्या निर्मात्यांविरोधात आणि दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाची चुकीची प्रतीमा दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. समाजसेवक सैय्यद आरिफ अली (Saiyad Arifali Mahemmodali) यांनी तक्रार दाखल केली आहे.  






'72 हुरैन'चे दिग्दर्शक संजय पूरन सिंह चौहान आणि निर्माते अशोक पंडित, गुलाब सिंह तंवर, अनिरुद्ध तंवर आणि किरण डागर यांच्यावर धर्माचा अपमान आणि चुकीची प्रतीमा दाखवल्याच्या आरोप करण्यात आला आहे. तसेच '72 हुरैन' हा प्रपोगंडा असून या सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे कमावण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 


'72 हुरैन'बद्दल जाणून घ्या... (72 Hoorain Movie Details)


निष्पाप लोकांना दहशतवादी कसे त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि धर्माच्या नावाखाली ते बलिदान द्यायला कसे तयार होतात याची झलक '72 हुरैन'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. या सिनेमात दोन दहशतवाद्यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अंगावरे शहारे आणणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जेएनयू विद्यापिठात या सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग पार पडलं.


'72 हुरैन' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (72 Hoorain Release Date) 


राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरन सिंह चौहान (Sanjay Puran Singh Chauhan) यांनी '72 हुरैन' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. 7 जुलै 2023 रोजी हा सिनेमा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


72 Hoorain : '72 हुरैन'चं जेएनयूच्या कॅम्पसमध्ये होणार विशेष स्क्रीनिंग; निर्मात्यांचा मोठा निर्णय