Sardar Udham: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2023) घोषणा करण्यात आली आहे. यंदा अनेक हिंदी, मराठी आणि साऊथ चित्रपटांनी विविध कॅटेगिरीमधील राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सरदार उधम (Sardar Udham) या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पाच कॅटेगिरीमधील पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक शूजित सरकारनं (Shoojit Sircar) हे पाच पुरस्कार अभिनेता इरफान खानला (Irrfan Khan) समर्पित केले आहेत.
सरदार उधम चित्रपटानं जिंकले हे पाच पुरस्कार-
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (अविक मुखोपाध्याय)
- सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर (वीरा कपूर EE)
- सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन (दिमित्री मलिच आणि मानसी ध्रुव मेहता)
- सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (सिंजॉय जोसेफ)
शूजित सरकारनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सरदार उधम चित्रपटाला मिळालेल्या पाच पुरस्कारांची माहिती देत लिहिलं, 'इरफान खान यांना समर्पित'
अभिनेता विकी कौशलनं देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'अभिनंदन टीम! सरदार उधमचा एक भाग होण्यासाठी अभिनमान वाटते ... हे इरफान सरांसाठी'
शूजितने सांगितले की, जेव्हा तो अभिषेक बच्चनसोबत पुढच्या चित्रपटाच्या तयारीची चर्चा करत होता, तेव्हा कोणीतरी त्याला फोन करून सरदार उधम चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली आणि ही बातमी कळाल्यानंतर अभिषेक बच्चनने त्याला मिठी मारून अभिनंदन केले.
सरदार उधम हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकी कौशलसोबतच शॉन स्कॉट, स्टीफन होगन, अमोल पराशर, बनिता संधू यांनी प्रमुख भूमिका साकारली. शुभेंदू भट्टाचार्य,रितेश शहा यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: