36 Gunn: लग्न ही आयुष्यातील अत्यंत तरल, हळूवार आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबांची सुंदर नात्यामध्ये बांधणी होत असते. नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांच्या '36 गुण' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. येत्या 4  नोव्हेंबरला '36 गुण' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 


आपल्या मनाचा आणि मताचा विचार न करता अपेक्षांचा मापदंड लावून लग्न करणाऱ्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक? काय बरोबर? या व्दिधा मनःस्थितीत त्यांचं नातं कोणतं वळण घेतं? याची मनोरंजक तितकीच विचारप्रवृत्त करायला लावणारी गोष्ट म्हणजे '36 गुण' चित्रपट. या टिझर मधूनही या सगळ्याची झलक पहायला मिळत आहे.


अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. नाती आशा-अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.


पाहा टीझर 






‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘36 गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Bigg Boss 16 Promo: 'रविवार का वार' मध्ये होणार नव्या सेलिब्रिटीची एन्ट्री; प्रोमो व्हायरल