Sharman Joshi On 3 Idiots Sequel : '3 इडियट्स' (3 Idiots) या बहुचर्चित सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 2009 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान (Aamir Khan), शरमन जोशी (Sharman Joshi) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. तेव्हापासून या सिनेमाच्या सीक्वेलची चाहते प्रतीक्षा करत आहेत. पण आता शरमन जोशीने या सिनेमाच्या सीक्वेलबद्दल भाष्य केलं आहे.


'3 इडियट्स'च्या सीक्वेलबाबत शरमन जोशीचा खुलासा


शरमन जोशीने (Sharman Joshi) डीएनएला दिलेल्या मुलाखतीत '3 इडियट्स'च्या (3 Idiots) दुसऱ्या भागाबद्दल भाष्य केलं आहे. शरमन म्हणाला,"3 इडियट्स'चा दुसरा भाग आला तर खरचं खूप मजा येईल. या सिनेमाच्या सीक्वेलची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात याचा राजू सरांना अंदाज आहे. चाहत्यांना निराश करण्याची त्यांची इच्छा नाही. दुसऱ्या भागाच्या कथानकावर सध्या राजू सरांचं काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच '3 इडियट्स'चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.






शरमन जोशी पुढे म्हणाला,"3 इडियट्स'च्या सीक्वेलवर काम करण्यासाठी राजू सर खूप उत्सुक आहेत. सध्या कथानकावर काम सुरू असल्याने प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कथानकाचं काम पूर्ण झाल्यावर लगेचच आम्ही शूटिंगला सुरुवात करू". 


'3 इडियट्स'बद्दल जाणून घ्या.. (3 Idiots Movie Details)


'3 इडियट्स' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात सिनेमात आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी मुख्य भूमिकेत होते. तर करीना कपूर खान, बोमन ईरानी, मोना सिंह आणि ओमी वैद्यदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. 55 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात जगभरात 460 कोटींची कमाई केली. 


'3 इडियट्स' हा सिनेमा त्यावेळचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या सिनेमाचा समावेश करण्यात आला आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 'ऑल इज वेल' (All Is Well) हा सिनेमातील डायलॉग खूप गाजला होता. आता '3 इडियट्स'चा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


संबंधित बातम्या


'3 Idiots' ते 'मुन्ना भाई एमबीबीएस'; प्रेक्षकांना खळखळून हसवणारे बॉलिवूडचे 'टॉप 10' चित्रपट