पुणे: पुण्यात दोन तरूणांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप रेगे सिनेमातील कलाकार आरोह वेलणकर याने केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

काल संध्याकाळी पाच वाजता कोथरुडमध्ये ते त्याच्या कारमध्ये बसले होते. दरम्यान मागून आलेल्या कारमधील व्यक्तीने हॉर्न वाजवला आणि त्याच्यात बाचाबाची झाली. त्यातच मागून दुचाकीवर असलेल्या प्रविण मोहोळ आणि संग्राम तांगडे यांनी आरोहला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

या प्रकारानंतर त्याठिकाणी पोलीस आले आणि त्यांनी प्रविण मोहोळला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार झाला आहे.