VIDEO: अंगावर शहारा आणणाऱ्या 'प्रोजेक्ट मराठवाडा'चा ट्रेलर
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2016 09:42 AM (IST)
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता टीव्हीवर बातम्यांमधून अनेकवेळा दिसली. मात्र आता हीच दाहकता दिग्दर्शक भाविन वाडिया मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेl. मराठवाड्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं भीषण वास्तव मांडणारा 'प्रोजेक्ट मराठवाडा' हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय दिलीप ताहिल, गोविंद नामदेव, सीम्स बिसवास यांचीही भूमिका आहे. प्रकाश पटेल, जिग्ना पटेल, जय पटेल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 3 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर VIDEO: