मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमारचा 2.0 हा या वर्षीचा मोस्ट अवैटेड असा चित्रपट आहे. येत्या गुरुवारी 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यावर इतका खर्च करण्यात आला आहे की, मराठीत किंवा एखाद्या प्रादेशिक भाषेत इतक्या बजेटमध्ये तीन-चार चित्रपट सहज तयार करता येतील. या गाण्याचे बजेट तब्बल 20 कोटी रुपये इतके आहे.

रजनीकांत आणि एमी जॅक्सन या दोघांवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ‘तु ही रे’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये रजनीकांत आणि अॅमी जॅक्सन खास रोबोटिक्स डान्स स्टेप्स करताना पाहायला मिळत आहेत. तेलुगु आणि तमिळ भाषेत हे गाणे अगोदरच प्रदर्शित करण्यात आले आहे. हिंदी भाषेतील गाण्याला अरमान मलिक आणि शाषा तिरूपती यांनी आवाज दिला आहे.



या गाण्याप्रमाणे 2.0 या चित्रपटावरदेखील कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 600 कोटी इतके आहे.