100 Days Of RRR : एसएस राजामौलींच्या (SS Rajamaouli) 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकतेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमाने फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली नसून संपूर्ण जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस 'आरआरआर' सिनेमा उतरत आहे. 


'आरआरआर' या सिनेमाने जगभरात 1150 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे हा सिनेमा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला आहे. 


'आरआरआर' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच रेकॉर्ड करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 165.50 कोटींची कमाई करत देशातील सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड 'आरआरआर' सिनेमाने केला. तर जगभरात या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 240 कोटींची कमाई केली होती. रिलीज तीन दिवसांत या सिनेमाने 490 कोटींचा टप्पा पार केला होता. 


कोरोना महामारीनंतर 200 कोटींचा टप्पा पार करणारा दुसरा हिंदी सिनेमा


'आरआरआर' हा कोरोना महामारीनंतर 200 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमाने देशात 772.1 कोटींची कमाई केली. तर जगभरात या सिनेमाने 1111.7 कोटींचा गल्ला जमवला. 


'आरआरआर'चे कलेक्शन जाणून घ्या


भाषा                                        कमाई
तेलुगू                                        428.27 कोटी
हिंदी                                         265.42 कोटी
तामिळ                                      58.48 कोटी
मल्याळम                                  18.41 कोटी
कन्नड                                        1.52 कोटी


बिग बजेट सिनेमा


तेलुगु पीरियड ड्रामा ‘RRR’ ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला.‘RRR’ हा खर्चाच्या दृष्टीने देखील मोठा चित्रपट आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनेकवेळा उशीर झाला होता, ज्यामुळे चित्रपटाच्या बजेटवर देखील वाईट परिणाम झाला. मात्र, एसएस राजामौली यांनी केवळ खर्चाची परतफेड केली नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदार आणि भागीदाराने या चित्रपटातून पैसे कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही ‘RRR’ ची क्रेझ अद्याप थांबली नाही.


संबंधित बातम्या


RRR Movie : आता प्रेक्षकांना घरीच बसून पाहता येणार ‘आरआरआर’, ओटीटीवर ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!


2022 Movies : 'द कश्मीर फाइल्स'पासून 'भूल भुलैया 2'पर्यंत 'या' भारतीय सिनेमांनी केली सर्वाधिक कमाई