Bollywood year Ender star kids: 2025 वर्ष संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. हे वर्ष बॉलिवूड मोठ्या स्टार्ससाठी जितकं खास ठरलं, तितकंच तो नव्या कलाकारांसाठी आणि स्टार किड्ससाठीही महत्त्वाचा ठरला. यंदा अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. काहींनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं, तर काहींच्या वाट्याला प्रेक्षकांची नाराजी आली. नेपोटिझमच्या चर्चांमध्येही काही स्टार किड्सनी आपलं टॅलेंटही सिद्ध केलं. चला तर पाहूया, 2025 मध्ये कोणाच्या डेब्यूने धुमाकुळ घातला अन् आणि कोणाची एन्ट्री फसली.

Continues below advertisement

Aaryan khan : आर्यन खान

शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खाननं अभिनयाऐवजी दिग्दर्शनाची वाट निवडली. 18 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सिरीजमधून त्यानं डेब्यू केलं. सिरीजचं लेखन, को-प्रोडक्शन आणि दिग्दर्शन आर्यननंच केलं. बॉलिवूडच्या झगमगाटामागची गोष्ट सांगणारी ही सिरीज वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिली आणि क्रिटिक्सकडूनही भरभरून दाद मिळाली.

Continues below advertisement

Ahan Pande : अहान पांडे

अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडेनं मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या रोमँटिक चित्रपटातून डेब्यू केलं. हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला. अहानच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं आणि तो रातोरात स्टार बनला.

Rasha Thadani: राशा थडानी

रवीना टंडनची मुलगी राशा थडानीनं अभिषेक कपूरच्या पीरियड ड्रामा ‘आजाद’मधून पदार्पण केलं. 17 जानेवारीला रिलीज झालेल्या या सिनेमात राशाच्या डान्स आणि अभिनयाचं, विशेषतः ‘उई अम्मा’ या गाण्यातील परफॉर्मन्सचं कौतुक झालं. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपयशी ठरला.

Aman Devgan: अमन देवगन

अजय देवगनचा पुतण्या अमन देवगननंही ‘आजाद’मधूनच बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. चित्रपटात अजय देवगन सपोर्टिंग रोलमध्ये दिसला. अमनच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही आणि चित्रपटाचाही बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रभाव पडला नाही.

Shanaya kapoor: शनाया कपूर

संजय कपूरची मुलगी शनायानं ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटातून डेब्यू केला. विक्रांत मॅसीसोबत झळकलेली ही फिल्म 11 जुलैला रिलीज झाली. मात्र, शनायाच्या अभिनयावर मिश्र प्रतिक्रिया आल्या आणि चित्रपट फ्लॉप ठरला.

Ibrahim Ali Khan:इब्राहिम अली खान

सैफ अली खान आणि अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम अली खाननं ‘नादानियां’ या रोमँटिक कॉमेडीमधून पदार्पण केलं. खुशी कपूरसोबतची ही फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली, पण निगेटिव्ह रिव्ह्यूजमुळे ती फ्लॉप ठरली.

Sara Arjun: सारा अर्जुन

बालकलाकार म्हणून ओळख असलेली सारा अर्जुननं 2025 मध्ये लीड रोलमधून डेब्यू केला. ‘धुरंधर’ या चित्रपटात ती रणवीर सिंहच्या अपोजिट दिसली. 5 डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमानं 350 कोटींहून अधिक कमाई करत ब्लॉकबस्टर यश मिळवलं. साराची परफॉर्मन्स डिसेंट असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. एकंदरीत पाहता, 2025 मध्ये 7 स्टार किड्सपैकी 3 जणांनी मोठी बाजी मारली, तर 4 जणांच्या वाट्याला काहीशी निराशा आली. नाव मोठं असलं तरी यशासाठी टॅलेंट आणि मेहनत तितकीच महत्त्वाची आहे, हे यंदाच्या स्टार किड्सच्या रिपोर्ट कार्डनं पुन्हा एकदा सिद्ध केलं.