Pune BJP News :  राज्यात महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला लगेच या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुण्यातील इतर पक्षातील अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळ यांच्या उपस्थित हे पक्ष प्रवेश झाले.  मात्र, या पक्ष प्रवेशावरुन भाजपचे वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. नाराज कार्यकर्त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयासमोरच आंदोलन सुरु केलं आहे. 

Continues below advertisement

पुण्यातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला

पुण्यातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. मात्र भाजपमध्ये झालेल्या या इन कमींगमुळे भाजपमधे वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पुण्यातील नाना पेठेतील भाजपचे हे नाराज कार्यकर्ते शहर कार्यालयासमोर जमले असुन आंदोलन सुरु झाले आहे. 

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच, पुण्यातील अनेक नेत्यांनी आज मुंबईत (Mumbai) पक्षप्रवेश केला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापुसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे . त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर रोहिणी चिमटे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. 

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड मधून भाजप प्रवेश केलेल नेते

1) संजोग वाघेरे - शहराध्यक्ष, ठाकरे गट 2) उषा वाघेरे - माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट3) प्रभाकर वाघेरे - माजी उपमहापौर, अजित पवार गट 4) प्रशांत शितोळे - माजी अध्यक्ष, स्थायी समिती - अजित पवार गट5) नवनाथ जगताप - माजी अध्यक्ष, स्थायी समिती ( शरद पवार गट )6) राजू मिसाळ - माजी उपमहापौर, अजित पवार गट 7) समीर मासुळकर - माजी नगरसेवक, अजित पवार गट 8) रवी लांडगे - भाजपचे माजी नगरसेवक ( सध्या ठाकरे गट ) 9) जालिंदर शिंदे - माजी नगरसेवक, अजित पवार गट 10) अमित गावडे - माजी नगरसेवक, ठाकरे गट 11) संजय काटे - माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते12) मीनल यादव - माजी नगरसेविका, ठाकरे गट 13) कुशाग्र कदम - मुलगा, माजी महापौर मंगला कदम14) प्रसाद शेट्टी - माजी नगरसेवक, अजित पवार गट 15) विनोद नढे - माजी नगरसेवक, अजित पवार गट

महत्वाच्या बातम्या:

Pune Politics: पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांच्या हाती 'कमळ', मुंबई पार पडला पक्षप्रवेशाचा सोहळा