Bollywood Actor Life Stroy: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी मुख्य भूमिका साकारल्या नसतानाही प्रेक्षकांवर छाप सोडली. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा ते अविभाज्य भाग बनलेत. असाच एक अभिनेता म्हणजे, शफी इनामदार (Shafi Inamdar). त्यांनी अगदी टेलिव्हिजन सीरिअल्सपासून ते अगदी सिनेमांपर्यंत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्यात. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1945 रोजी महाराष्ट्रात झाला.

Continues below advertisement

शफी इनामदार यांनी 1982 मध्ये 'विजेता' या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. 1983 च्या ब्लॉकबस्टर 'अर्धसत्य'मध्ये त्यांनी इन्स्पेक्टर हैदर अलीची भूमिका केली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि ते यशाच्या शिडी चढत राहिले.

'आज की आवाज' या चित्रपटात शफी इनामदारनं एका पोलिसाची भूमिका साकारली होती. 'आवाम'मध्ये खलनायकाची भूमिका केली होती आणि 'नजरना', 'अनोखा रिश्ता' आणि 'अमृत'मध्ये हिरोचा मित्र होता. शफीची अद्वितीय प्रतिभा अशी होती की, तो प्रत्येक भूमिकेत इतक्या सहज बसायचा की, पाहाणाऱ्यांना असंच वाटायचं की, दुसरं कुणीही ती भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकलंच नसतं.

Continues below advertisement

पडद्यावरच्या त्यांच्या कौशल्याव्यतिरिक्त शफी इनामदार यांनी टेलिव्हिजनवरही वर्चस्व गाजवलं. त्यानं 'ये जो है जिंदगी' या लोकप्रिय मालिकेत एक दमदार भूमिका साकारलेली. गुलजार यांच्या 'गालिब' या मालिकेतही त्यानं महत्त्वाची भूमिका बजावलेली. अभिनयाव्यतिरिक्त, शफी यांनी ऋषी कपूर, नाना पाटेकर आणि पूजा भट्ट यांच्या 'हम दोनो' या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलेलं. हा चित्रपट हिट झाला आणि शफी यांना एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत नाव मिळवून दिलं. 

टीम इंडियाचा सामना पाहत असतानाच हृदयविकाराचा झटका

13 मार्च 1996 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट वर्ल्ड कप सेमीफायनल पाहत असताना शफी इनामदार यांना हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार, शफी इनामदार मोठे क्रिकेटप्रेमी होते. शूटिंगच्या दरम्यानसुद्धा मॅच असेल तर ते सतत स्कोअर विचारायचे. जेव्हा वर्ल्डकप सामना होता, त्यावेळी भारत हरत असल्याचं त्यांना सहन झालं नाही आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या कारकिर्दीत शफी इनामदार यांनी जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Singer Lucky Ali Criticizes Lyricist Javed Akhtars: 'जावेद अख्तर सारखं बनू नका, फेक...'; दिग्गज गायकाची युजरच्या पोस्टवर कमेंट, सोशल मीडियावर चाहते भिडले