Maharashtra Rain News : अरबी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे उद्यापासून कर्नाटक, गोवा आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसगारात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या दोन्हीही कमी दाबाचे क्षेत्र प्रणालीचा प्रभाव टाकत असल्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कोकणात पुढील तीन दिवस मेघ गर्जनेसह पावसाची (Maharashtra Rain) शक्यता (Meteorological Department) वर्तवली आहे.

Continues below advertisement

मिळलेल्या माहितीनुसार, सध्या कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस पडल्यास कापलेल भात भिजून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तर जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, दिवाळीच्या दोन दिवसात फटाक्याची आतिशबाजी मुंबईत जोरदार सुरू आहे. याचा फटाक्याचा परिणाम मुंबईच्या हवेवर आणि प्रदूषणावर झाला आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईत बुधवारी धूसर वातावरण पाहायला मिळाले. दिवाळीत काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे आज वातावरणात हलकासा बदल जाणवत आहे. तर AQI चा उच्चांक ही खाली आला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील दोन दिवस काही भगत पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Mumbai Pollution: 'दिवाळीचा धूर, मुंबईकर हैराण', खोकला-सर्दीची साथ

मुंबईतील (Mumbai) दिवाळीच्या (Diwali) आतषबाजीमुळे वाढलेले प्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे आजच्या बातमीचे मुख्य मुद्दे आहेत. 'प्रदूषणामुळे अनेकांना खोकला सर्दीचा त्रास सुरू झाला आहे', ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या दोन दिवसात फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीमुळे मुंबईची(Mumbai) हवा अत्यंत प्रदूषित झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 'खराब' ते 'अतिशय खराब' श्रेणीत पोहोचला आहे. शहरात अनेक ठिकाणी पहाट धुरकटलेली (Smog) होती, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. या प्रदूषित हवेमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये, खोकला आणि सर्दीसारखे आजार वाढत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांत काही भागांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे प्रदूषणातून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा