Bollywood Suspenseful Thriller Movie: ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सस्पेन्स, थ्रिलर आणि रोमँटिक ड्रामानं भरलेले असंख्य चित्रपट आणि सीरिज (Web Series) रोज म्हटलं तरी रिलीज होत असतात. पण काही चित्रपट खरोखरच हृदयाला स्पर्श करतात. आज आपण अशाच एका हिंदी चित्रपटाबद्दल (Hindi Movie) बोलत आहोत, ज्यानं धमाकेदार पटकथेनं आणि आश्चर्यकारक शेवटानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा चित्रपट जुलै 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला आणि लगेचच सोशल मीडियावर, प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला. या सिनेमाची स्टोरी आणि धमाकेदार स्टारकास्टनं चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. सिनेमा पाहून प्रेक्षकांनी लवकरच सिनेमाचा सिक्वल कधी येणार? अशी विचारणा करायला सुरुवात केली. अखेर 2024 मध्ये सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित झाला आणि पहिल्या पार्टसारखाच तोसुद्धा सुपरडुपर हिट ठरला.
सिनेमाची अनोखी कहाणी
सिनेमात रानी आणि रिशु या जोडप्याची अनोखी कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्यांचं लग्न अरेंज मॅरेज असतं, पण लग्नानंतर मात्र त्यांच्या नात्यात दुरावा कायम असतो. त्यांच्या आयुष्यात दुरावा वाढतो. तेव्हा रानीच्या आयुष्यात नीलची एन्ट्री होते. या सिनेमातलं नील हेच पात्र कहाणीत अनेक नवे ट्वीस्ट घेऊन येतं. रानी आणि रिशु दोघेही या बदलांमुळे त्रस्त असतात आणि यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधत असतात. तेवढ्यात एक मर्डर केस समोर येते, ज्यामुळे सर्वकाही आणखी विस्कटून जातं. फिल्म 'हसीन दिलरुबा' पाहून प्रत्येकजण विचारात पडतोय की, खरा खुनी नेमका कोण? फिल्मचा शेवट एवढा दमदार आहे की, प्रेक्षक या कथेमध्ये पूर्णपणे गुरफटून जातात.
धमाकेदार स्टार कास्टची थ्रीलर कहाणी
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्यात तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे, आशिष वर्मा आणि अदिती चौहान हे कलाकार आहेत. हा चित्रपट विनिल मॅथ्यू यांनी दिग्दर्शित केला आहे आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिलाय. 'हसीन दिल्लरुबा'ला IMDb वर 10 पैकी 6.9 रेटिंग मिळालंय. दरम्यान, 'फिर आयी हसीन दिल्लरुबा'ला कमी प्रतिसाद मिळाला, त्याला फक्त 5.8 रेटिंग मिळालंय.
सिक्वलपेक्षा पहिलाच पार्ट दमदार
रानी आणि रिशु आपल्या भूतकाळाची चौकशी करणाऱ्या पोलिसांपासून वाचण्यासाठी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात. मग कोणताही पर्याय नसल्यामुळे रानी एका मुलाशी प्रेमाचं नाटक करते आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. पण, फिल्मच्या शेवटी एक असं वळण येतं की, साधा विचार करुनही तुमचं डोकं हादरुन जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :