39 Year Old TV Show: सिनेसृष्टीचा तिसरा पडदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओटीटीची क्रेझ झपाट्यानं वाढली आहे. मोबाईल सिनेमा म्हणूनही ओळखलं जातं. ओटीटीमुळे मनोरंजन हातात आलं आहे. इथे तुम्हाला नवीन, जुने सर्व सिनेमे वेब सीरिज पाहता येतात. फक्त पाहताच येत नाहीत, तर तुमच्या सोयीनुसार पाहू शकता.
ज्यामध्ये मिर्झापूर, गुल्लक, पंचायत, द फॅमिली मॅन आणि सेक्रेड गेम्स सारख्या लोकप्रिय वेब सीरिजचा समावेश आहे. या सर्व वेब सीरिजना उत्कृष्ट रेटिंग मिळालंय, पण तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की, या सर्वांमध्ये, एक जुना टीव्ही शो आहे, जो अजूनही या सीरिजना मागे टाकतो. ऑनलाईन रेटिंग प्लॅटफॉर्म आयएमडीबीनं देखील त्याला उत्कृष्ट रेटिंग दिलं आहे. तुम्हाला या टीव्ही शोबद्दल माहितीय का?
आम्ही ज्या शोबाबत बोलतोय, तो म्हणजे, 39 वर्षांपूर्वीचा टीव्ही शो 'मालगुडी डेज'. 1986 मध्ये दूरदर्शनवर आलेल्या या शोचे इंग्रजीत 13 भाग आहेत, आणि हिंदीत 50 हून अधिक भाग आहेत. आरके नारायण यांच्या लघुकथांवर आधारित, हा शो निर्मात्यांनी उधार घेतलेल्या पैशांचा वापर करून बनवला होता. प्रेक्षकांना हा सिनेमा इतका आवडला की, निर्मात्यांनी त्यांचं सर्व कर्ज फेडलं. पहिले तीन सीझन शंकर नाग यांनी दिग्दर्शित केले होते आणि चौथा सीझन कविता लंकेश यांनी दिग्दर्शित केलाय. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये प्रत्येकी 13 एपिसोड होते आणि चौथ्या सीझनमध्ये 15 एपिसोड होते. आयएमडीबीनं या शोला 9.4 रेटिंग दिलं आहे, जे आजच्या पंचायत, गुल्लक, मिर्झापूर आणि फॅमिली मॅन सारख्या सुपरहिट सीरिजपेक्षा जास्त आहे.
'मालगुडी डेज' नावाचा सिनेमाही आहे...
1980 च्या दशकात हा शो खूप प्रसिद्ध होता आणि इंडियन रेल्वेनं या शोला ट्रिब्यूट देत, कर्नाटकातील अरसालू रेल्वे स्टेशनचं नाव बदलून मालगुडी रेल्वे स्टेशन केलं होतं. या शोमध्ये गिरीश कर्नाड आणि अनंत नाग यांच्यासह अनेक प्रमुख कलाकारांचा समावेश होता. मास्टर मंजुनाथ यांनी स्वामींची महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना खूपच प्रभावित केलेलं. 2020 मध्ये मालगुडी डेज नावाचा एक चित्रपट बनवण्यात आला होता, जो अमेझॉन प्राइमवर होता. तो किशोर मुडबिद्री यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. पण, सिनेमापेक्षाही टीव्ही शोची चर्चा सगळीकडे रंगली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :