Beed Kapildharwadi Landslides : गेल्या 20 दिवसांमध्ये बीड तालुक्यातील कपिलधारवाडी गावातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. 100 घरं असलेल्या गावात भूस्खलन (Landslides) होऊ लागल्याने 50 पेक्षा अधिक घरांना तडे गेलेत. गाव भूस्खलनात कधी गडप होईल हे सांगता येत नाही. गावातील रस्ते आणि घरे खचल्याने 500 ग्रामस्थांचे आजही ऐन दिवाळीत (Diwali 2025) मंदिरामध्ये स्थलांतर आहे. दहा दिवसांपूर्वी केंद्राच्या जीएसआय पथकाने पाहणी केली. मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र या सगळ्यात या गावातील ग्रामस्थांना दिवाळी मात्र मंदिराचा आसरा घेत साजरी करावी लागली आहे.

Continues below advertisement

Beed Kapildharwadi Landslides: अद्याप प्रशासनाकडून पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना नाही

बीड जवळील कपिलधार वाडी गाव डोंगराच्या कुशीत वसलेल आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने गावात भूस्खलन होऊ लागले. मागील 20 दिवसात त्याची तीव्रता अधिक वाढली. हा धोका लक्षात घेता प्रशासनाने गावाचे स्थलांतर परिसरातील मन्मथ स्वामी मंदिरात केले आहे. तर काही जणांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतलाय. 20 दिवसांमध्ये स्थानिक प्रशासनासह जीएसआयच्या पथकाने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पाहणी केली. मात्र अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

भूस्खलनाचे नेमके कारण काय? (What is the Exact Cause of Landslides?)

कपिलधारवाडी हे गाव डोंगराच्या कुशीत आहे. सप्टेंबर मध्ये झालेल्या सततच्या पावसाने जमिनीचा स्तर कमी झाला. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या, घरांना तडे गेले. याचा वेग ही जास्त आहे. पाच ते सहा फुटांपेक्षा अधिक रुंद भेगा दिसत आहेत. यामुळे धुळे सोलापुर महामार्ग ही खचू शकतो. गावाचे पुनर्वसन हा एकमेव पर्याय असल्याचं डॉ.ए.पी.जे कलाम खगोल संशोधन केंद्राचे संचालक डॉ.श्रीनिवास औंधकर यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

Bhandara : गजबजलेल्या वस्तीतील घराच्या बाथरूममध्ये शिरली अस्वल, भंडाऱ्याच्या पवनी शहरातील घटना

जंगलातून भरकटलेलं एक अस्वल थेट पवनी शहरात शिरलं. रात्रीच्या सुमारास गावातील नागरिक दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असताना अचानक अस्वल दिसल्यानं त्यांनी आरडाओरड केल्यानं अस्वलनं एका पडक्या घरातील बाथरूममध्ये आश्रय घेतला. यावेळी पवनी वन विभाग आणि RRT पथकानं मोठ्या शिताफीनं अस्वलाला जेरबंद करून वन विभागाच्या अधिवासात सोडलं. हा संपूर्ण प्रकार पवनी शहरातील बेलघाटा वार्डात रात्रीच्या सुमारास घडला. वन विभागाची टीम तातडीनं दाखल झाल्यानं कुठलीही अनुचित घटना घडली नाही, हे विशेष.

आणखी वाचा