मुंबई : गायिका श्रेया घोषालने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. श्रेया इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. आज श्रेयाने मुलाला जन्म दिला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. तिनं म्हटलं आहे की, आज दुपारी देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान पुत्र दिला आहे. अशा प्रकारची भावना या आधी कधीच अनुभवली नव्हती. शिलादित्य, मी आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी श्रेयानं फोटो शेअर करत गूडन्यूजबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. याचवेळी तिने बाळाचं नाव देखील सांगितलं होतं. बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होतोय. आम्ही आयुष्यातील नव्या आध्यायाची सुरूवात करत आहोत. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम याची आम्हाला गरज आहे, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं होतं.
प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत अनेक वर्षांच्या प्रेमानंतर श्रेयाने 2015 साली लग्नगाठ बांधली होती. श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे.