Bollywood : बॉलिवूडपासून ते साउथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेक टॅलेंटेड अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असतात. ज्या अॅक्शनपासून ड्रामापर्यंतच्या सर्व सिनेमात जबरदस्तपणे अभिनय सादर करत आहेत. मात्र, अजूनही मानधनाच्या बाबतीत त्या अभिनेत्यांच्या तुलनेत खूपच मागे आहेत. सर्वच बाबतीत हिरोच्या बरोबरीने काम करूनही अभिनेत्रीना फारच कमी मानधन मिळते. पण आता काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या हा भेदभाव मोडून काढत हिरोइतकं मानधन मागत आहेत. चला तर मग आज आपण बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे हे पाहूया –
आजच्या घडीला बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री म्हणताना आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि नयनतारा यांची नावं सर्वप्रथम घेतली जातात. आलिया आणि दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत, तर नयनताराने स्वतःला एक पॅन इंडिया स्टार म्हणून सिद्ध केलं आहे.
आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याशी असलेल्या वादामुळे चर्चेत राहिली आहे. दीपिका आणि आलिया या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी आहे. दीपिकाने आपल्या ‘कल्कि 2898 ए.डी.’ या चित्रपटासाठी 20 कोटी आणि शाहरुख खानसोबतच्या ‘पठाण’साठी 15 कोटी रुपये मानधन घेतले होते.
बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री आहे, जी गेल्या 4 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे, पण तरीही ती इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री 43 वर्षांची असून एक मुलीची आई आहे. तिने आपल्या शेवटच्या वेबसीरीजसाठी तब्बल 41 कोटी रुपये मानधन घेतले होते आणि येणाऱ्या चित्रपटासाठी ती 30 कोटी रुपये घेत आहे.
ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून, आपल्या देसी गर्ल प्रियंका चोप्रा आहे. तिने सर्वांनाच मागे टाकत बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. आज ती आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने ‘सिटाडेल’ या Amazon Prime Video वरील शोसाठी 41 कोटी रुपये मानधन घेतले होते.
प्रियंका चोप्राला एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘SSMB29’ साठी 30 कोटी रुपये मानधन मिळाले आहे, जे आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीला मिळालेले सर्वाधिक मानधन आहे. त्यामुळे देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे.प्रियंका चोप्रा शेवटची बॉलिवूड चित्रपट ‘द व्हाईट टायगर’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती राजकुमार राव आणि आदर्श गौरवसोबत झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.2019 साली प्रियंका चोप्रा शेवटच्या वेळेस सिल्व्हर स्क्रीनवर झळकली होती. ती फरहान अख्तरसोबत ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती मुख्यतः हॉलिवूडकडे वळली.
प्रियंका चोप्राच्या कमाईबद्दल सांगायचं झालं, तर तिच्या इन्स्टाग्रामवर 92.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या प्रोडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे. तिची एकूण नेटवर्थ सध्या 650 कोटी रुपये आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मेला सिनेमात 'रुपा'चा छळ करणारा डाकू गुज्जर सिंह आता कसा दिसतो? खऱ्या आयुष्यातही केलं होतं मोठं कांड