TV Highest Paid Host: टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट (Television's Most Expensive Host) कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर सर्वांचं लगेच उत्तर येतं, सलमान खान. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, टेलिव्हिजनचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो (Television's Biggest Reality Show) बिग बॉस (Bigg Boss) होस्ट करण्यासाठी सलमान खान (Salman Khan) कोट्यवधींचं मानधन घेतो. पण, तुम्हाला माहितीय का? कोट्यवधींचं मानधन घेत असला तरीसुद्धा 'टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट' हा टॅग आता सलमानकडे राहिलेला नाही. एका दिग्गज अभिनेत्यानं सलमान खानकडून हा टॅग हिसकावून घेतला आहे. एक दिग्गज अभिनेता आता 'टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट' ठरला आहे. 

Continues below advertisement

सलमान खान टीव्हीवर बिग बॉस होस्ट करतो आणि त्याला टीव्हीवरील 'सर्वात महागडा होस्ट' म्हटलं जायचं, पण आता मात्र सलमान खान नाहीतर बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) 'टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट' ठरले आहेत. कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या क्विज बेस्ड शो होस्ट करण्यासाठी त्यांनी सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती मिळत आहे. एवढं की, त्यांनी मानधन घेण्याच्या बाबतीत सलमान खानलाही मागे टाकलं आहे. 

बिग बींनी केबीसी 17 होस्ट करण्यासाठी किती मानधन घेतलंय? 

Siasat.com च्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन KBC 17 च्या प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटी रुपये घेत आहेत. हा शो आठवड्यातून पाच वेळा प्रसारित होतो, म्हणजेच, अमिताभ बच्चन यांचं आठवड्याचं मानधन 25 कोटी रुपये आहे. 

Continues below advertisement

अमिताभ यांनी मानधनाच्याबाबतीत सलमान खानला टाकलं मागे 

यासह, अमिताभ बच्चन सलमान खानला मागे टाकत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही होस्ट बनलेत. बिग बॉस ओटीटी 2 दरम्यान, सलमान खानला प्रत्येक वीकेंड का वार एपिसोडसाठी 12 कोटी रुपये देण्यात आले होते, म्हणजेच, त्याचं आठवड्याचे मानधन सुमारे 24 कोटी रुपये होतं. पण, हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सलमान आठवड्यातून फक्त दोन दिवस बिग बॉससाठी शूटिंग करतो. 

बिग बॉस 17 कधी येणार? 

सोनी टीव्हीनं नुकताच अमिताभ बच्चन आणि सुंबुल तौकीर यांचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यासोबतच निर्मात्यांनी शो टेलिकास्ट कधीपासून होणार? याची तारीखही जाहीर केली आहे. कौन बनेगा करोडपतीचा 17 वा सीझन आता 11 ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर टेलिकास्ट केला जाणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Santosh Juvekar On Vicky Kaushal: 'तू तर माझ्यापेक्षाही...' औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यावर संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर काय म्हणाला 'छावा' फेम विक्की कौशल?