Mela Movie Fame Daku Gujjar Singh Tinu Verma : साल 2000 मध्ये आलेला आमिर खान आणि ट्विंकल खन्ना यांचा चित्रपट ‘मेला’ आठवतोय का? जरी हा चित्रपट आमिर खानच्या कारकिर्दीतील एक सुपर फ्लॉप चित्रपट ठरला असला, तरी आजही या चित्रपटाची बऱ्यापैकी चर्चा होते. या चित्रपटात एक असं पात्र होतं, जे पाहिल्यानंतर प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. हे पात्र होतं खलनायक गुज्जर सिंगचं. डाकू गुज्जर सिंगने रूपा या पात्रावर केलेल्या अत्याचारांनी फक्त गावकऱ्यांच्या नव्हे, तर प्रेक्षकांच्याही डोळ्यांत पाणी आणलं होतं.

‘मेला’मध्ये हे भयावह पात्र अभिनेता टीनू वर्मा यांनी साकारलं होतं. त्या काळात टीनू वर्माचं नाव इंडस्ट्रीतील सर्वात धोकादायक खलनायकांपैकी एक म्हणून घेतलं जात होतं. मात्र अचानक टीनू वर्मा रुपेरी पडद्यावरून गायब झाले आणि कोणालाही त्याच्या या गायब होण्याची खबरसुद्धा लागली नाही. तर आज आपण पाहूया की टीनू वर्मा आता कुठे आहेत आणि काय करत आहेत?

टीनू वर्मा यांनी फक्त ‘मेला’मध्येच नव्हे, तर ‘राज’, ‘माँ तुझे सलाम’, ‘घातक’, ‘गुलामी’ आणि ‘आंखें’ अशा अनेक चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 1993 साली आलेल्या गोविंदा स्टारर ‘आंखें’ या चित्रपटातून झाली होती. या चित्रपटात त्यांनी तेजेश्वर नावाचं एक छोटं पात्र साकारलं होतं. त्यानंतर ते ‘घातक’ आणि ‘हिम्मत’सारख्या चित्रपटांमध्ये झळकले. मात्र काही लहान-मोठ्या भूमिका केल्यानंतर ते अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाले.

पण, ऑगस्ट 2013 मध्ये टीनू वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले, जेव्हा त्यांच्याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली. बातमी अशी होती की टीनू वर्मा यांनी आपल्या सावत्र भाऊ मनोहर वर्मावर तलवारीने हल्ला केला आहे. ही बातमी ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. या वादामागे वंशपरंपरागत संपत्तीशी संबंधित कारण असल्याचं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात, टीनू आणि त्यांचा सावत्र भाऊ यांच्यात गोरेगाव येथील एका फार्महाऊसवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता.

या संपत्तीच्या वादामुळे प्रकरण इतकं चिघळलं की 23 ऑगस्ट 2013 रोजी दोघांमध्ये जबरदस्त भांडण झालं आणि या वादातच टीनू वर्मा यांनी तलवार काढून आपल्या सावत्र भावावर हल्ला केला. या हल्ल्यात मनोहर वर्माला अनेक जखमा झाल्या होत्या. जरी टीनू वर्मा यांना बॉलिवूडमध्ये फारसं काम मिळालं नाही, तरी अल्पावधीतच त्यांनी त्यांच्या अभिनयाचं अस्तित्व सिद्ध केलं होतं. ‘मेला’ चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी टीनू यांचा धोकादायक लूक आणि काळ्या काजळयुक्त डोळ्यांनी प्रेक्षकांना चांगलंच घाबरवलं होतं.

दरम्यान, टीनू वर्मा सध्या सिनेसृष्टीत सक्रिय काम करत नसला तरी इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असतो. अनेक पॉडकास्टमध्ये देखील टीनू वर्मा बोलताना पाहायला मिळालाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : उदयनराजे भोसले बोलतोय! असं म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न