25 Years Of Dil To Pagal Hai : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) अभिनीत 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) या चित्रपटाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. 1997 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 30 ऑक्टोबरला म्हणजेच आज 25 वर्ष पूर्ण केली आहेत. कॉलेजमधील मैत्री आणि लव्हस्टोरी दाखवणारी या चित्रपटातील रोमँटिक गाणी आजही लोकांना ऐकायला आवडतात. या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ : 






यशराज फिल्मच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. याच चित्रपटातील 'दिल तो पागल है' गाण्याचा व्हिडीओ यश राज फिल्म्सने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील काही खास दृश्य दाखविण्यात आली आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असे लिहीले आहे की, 25 वर्षांपूर्वी… राहुलने विचारले ‘मोहब्बत क्या है?’ आणि ‘दिल तो पागल है’ ने आपल्या सर्वांसाठी प्रेम आणि मैत्रीची नवीन व्याख्या निर्माण केली. चित्रपटाचा आनंद शेअर करताना या ठिकाणी #25yearsofDTPH  असे लिहीले आहे. 


25 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा 


25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. 'दिल तो पागल है' या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. करिश्मा कपूरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि श्यामक दावर यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी पुरस्कार देण्यात आला.


चाहत्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या


'दिल तो पागल'चा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आठवणीही ताज्या झाल्या असून यूजर्स सातत्याने कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले- 'हा एक चित्रपट आहे जो मी विसरणार नाही. तर दुसऱ्याने लिहिले- 'हा चित्रपट पाहून खरोखर आनंद झाला. त्याचप्रमाणे इतर अनेक यूजर्सदेखील शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' (Pathan) चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित करण्यात यावा असे म्हणताना दिसले. 


महत्वाच्या बातम्या : 


Happy Birthday Ananya Panday : वयाच्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकी' फी