bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले वयाची 35 वर्ष ओलांडली तरी अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. त्यापैकीच एक अभिनेत्री 40 वर्षांची झाली असून लग्नाच्या दबावात तिने egg freezing करण्याचा निर्णय घेतलाय. मनोरंजन क्षेत्रात अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वैयक्तिक आयुष्यापेक्षा कामाला अधिक महत्त्व दिलं आहे. त्यामुळे बऱ्याच जणींनी अजून लग्न केलेलं नाही. त्यापैकीच डेजी शाह ही देखील एक आहे. अभिनेत्री आता 40 वर्षांची झाली असून तिने पुरुषांबाबत काही मतं व्यक्त केली आहेत. जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाह बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. मात्र ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि सतत काही ना काही शेअर करत असते. डेजी शाह 40 वर्षांच्या असून तिने अद्याप लग्न केलेले नाही. लग्नाबाबत कुटुंबीय तिच्यावर सातत्याने दबाव टाकतात. याबाबत तिने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं
डेजी म्हणाली, “बाबांच्या निधनानंतर माझ्या आयुष्यात जो कोणी आला, त्याला वाटलं की तोच आमच्या कुटुंबातील पुरुष आहे. दुसरीकडे माझ्या बहिणीच्या नवऱ्यालाही नेहमीच असं वाटायचं की कुटुंबातील सगळे निर्णय तोच घेणार. पण मी मनाशी ठरवून घेतलं होतं – नाही, मीच माझ्या कुटुंबातील पुरुष आहे, तुम्ही नाही.”
लग्नाबद्दल बोलताना डेजी म्हणाली , “मी लग्नाचा विचार केला नाही का? नक्कीच केला. माझे मोठे पप्पा (काका) – जे दुर्दैवाने आता हयात नाहीत – तेच एकटे होते ज्यांनी आई आणि बहिणीला शांत केलं. अन्यथा सगळे मला त्रास द्यायचे – ‘लग्न कर, लग्न कर.’ माझे मोठे पप्पा नेहमी म्हणायचे – ‘मुलगी स्वतंत्र आहे, छान सेटल आहे. आणखी किती सेटल व्हायचं? मुलगा आला तरच सेटल होणार का?’ त्यांच्या मुळे कुणाची हिम्मत झाली नाही की माझ्यावर लग्नाचा दबाव आणावा.”
डेजी पुढे म्हणाल्या – “आता तर माझी आईसुद्धा म्हणते – करायचं असेल तर कर, नाही करायचं तर नको, काही हरकत नाही. प्रश्न माझ्यासमोरच येतो – मला खरंच लग्न करायचं आहे का? आणि आजकाल जी नाती मी पाहतेय, त्यात मला मनापासून लग्न करण्याची इच्छा होत नाही.”त्यांनी सांगितलं – “आता मी काय करू? मी माझं आयुष्य आधीच व्यवस्थित सेट करून ठेवलंय. मी माझ्या आयुष्यात इतकी सुरक्षित आहे की मला एखाद्या पुरुषाची गरज नाही की तो मला आर्थिकदृष्ट्या पूर्ण करेल. कारण मी स्वतःच व्यवस्थित कमावते, सक्षम आहे.”
डेजी म्हणाल्या – “मी egg freezing केलं आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला हा सल्ला दिला होता. तिने सांगितलं – ‘करून ठेव, भविष्याचं काही सांगता येत नाही. काय माहिती पुढे तुला मुलं हवी असतील. जर लग्न केलं नाही तरी आणि तुझा वारसा पुढे न्यायचा असेल तर फ्रीज करून ठेव, यात काहीही चुकीचं नाही.’”
इतर महत्त्वाच्या बातम्या
'शिवाजी महाराजांची भेट झाली', सैराट फेम अरबाज शेखची रायगडावरील फोटो शेअर करत खास पोस्ट