'शिवाजी महाराजांची भेट झाली', सैराट फेम अरबाज शेखची रायगडावरील फोटो शेअर करत खास पोस्ट
Sairat fame Arbaz Shaikh : शिवाजी महाराजांची भेट झाली, सैराट फेम अरबाज शेखची रायगडावरील फोटो शेअर करत खास पोस्ट
Sairat fame Arbaz Shaikh
1/8
मराठी सिनेसृष्टीतील सैराट हा सिनेमा देशभर गाजला. शिवाय मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून देखील सैराट या सिनेमाने वेगळी ओळख निर्माण केली.
2/8
दरम्यान, सैराट सिनेमात 'बांगड्या वाल्या भाभीचा सल्ल्या' ही भूमिका साकारणारा अरबाज शेख पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
3/8
अरबाज शेख याने इन्स्टाग्रामवर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील काही फोटो शेअर केले आहेत.
4/8
"शिवाजी महाराजांची भेट झाली.." असं कॅप्शन अरबाज शेख याने या पोस्टला दिले आहे. यावेळी तो त्याची गर्लफ्रेंड सिमरन हिच्यासोबत पाहायला मिळतोय.
5/8
मराठी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांमध्ये ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेकांनी अरबाजच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे.
6/8
रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असून त्याला मराठी जनतेच्या हृदयात अनन्यसाधारण स्थान आहे.
7/8
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी अरबाज शेख याने पुण्यात एक मेन्स वेअर शॉप उघडलं आहे.
8/8
या शॉपच्या उद्घाटन समारंभासाठी नागराज मंजुळेंसह दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते.
Published at : 22 Aug 2025 01:18 PM (IST)
= 8">