Bollywood : महानायक अमिताभ बच्चन म्हणजे शतकातील महान कलाकारांपैकी एक... आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि "अँग्री यंग मॅन" म्हणून कोट्यावधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलंय. आजही बिग बी पूर्णपणे सक्रिय आहेत आणि मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत त्यांचीच चर्चा आहे. शिवाय अमिताभ बच्चन आलिशान जीवन जगतात आणि त्यांच्या नावावर हजारो कोटींची संपत्ती आहे. चला तर जाणून घेऊया की या सुपरस्टारच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल आणि त्यांच्या संपत्तीची वाटणी कशाप्रकारे केले जाईल?
अमिताभ बच्चन यांची संपत्ती किती?
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटांमधून आणि लहान पडद्यावरील क्विझ शो कौन बनेगा करोड़पति मधून प्रचंड संपत्ती कमावली आहे. लाइफस्टाइल एशियाच्या एका रिपोर्टनुसार, बिग बी यांच्याकडे सुमारे 3,190 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या अनेक आलिशान बंगल्यांपैकी जलसा या बंगल्याची किंमत तब्बल 112 कोटी रुपये आहे. जनक आणि वत्स सारख्या इतर बंगल्यांचीही किंमत कोट्यवधींमध्ये आहे. तसेच बिग बी यांच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे . बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, रेंज रोवर, रोल्स रॉयस, लेक्सस एलएक्स 570 आणि ऑडी ए8एल यांचा त्यात समावेश होतो. शिवाय बिग बी सुमारे 260 कोटी रुपयांच्या प्रायव्हेट जेटचेही मालक आहेत.
3 हजार कोटींच्या संपत्तीचा वारस कोण?
अमिताभ बच्चन यांच्या या प्रचंड संपत्तीचे कायदेशीर वारसदार म्हणजे पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन आहेत. बिग बींचं आपल्या मुलाएवढंच मुलीवर देखील तेवढचं प्रेम आहे. त्यांनी 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, "जेव्हा मी मरेल, तेव्हा माझ्याकडे असलेली संपत्ती माझ्या मुलगी आणि मुलामध्ये समान वाटली जाईल. यात कुठलाही भेदभाव नसेल. जया आणि मी खूप आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्वजण म्हणतात की मुलगी परक्यांचं धन असते, ती सासरी जाते. पण माझ्या नजरेत ती आमची मुलगी आहे आणि तिला अभिषेकसारखेच हक्क आहेत."
श्वेता बच्चनला गिफ्ट मिळाला होता ‘प्रतिक्षा’
अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी मुंबईतील आपला प्रतिक्षा हा करोडोंचा बंगला मुलगी श्वेता बच्चनला गिफ्ट म्हणून दिला होता. या बंगल्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
ऐश्वर्याला मिळणार का हिस्सा?
अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीतून सून ऐश्वर्या राय बच्चनला थेट कायदेशीर हिस्सा मिळणार नाही. मात्र, अभिषेक बच्चनची पत्नी आणि आराध्याची आई असल्याने अप्रत्यक्षरित्या तिचा या संपत्तीशी संबंध राहणार आहे.
बच्चन कुटुंबाची एकूण नेटवर्थ
अमिताभ बच्चन : 3,110 कोटी रुपये (प्रतिक्षा गिफ्ट केल्यानंतर)
जया बच्चन : 1,083 कोटी रुपये
ऐश्वर्या राय बच्चन : 828 कोटी रुपये
अभिषेक बच्चन : 280 कोटी रुपये
श्वेता बच्चन : 110 कोटी रुपये (यात गिफ्ट केलेला प्रतिक्षा समाविष्ट नाही)
अगस्त्य आणि नव्या नंदा : अनुक्रमे 1-2 कोटी रुपये आणि 16 कोटी रुपये
इतर महत्त्वाच्या बातम्या