Bollywood : बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी एका कुटुंबातील कलाकारांसोबत काम केले आहे. त्यापैकीच एक आहे अनुष्का शर्मा. तब्बल 17 वर्षांपूर्वी अनुष्काने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले. तिने सर्वप्रथम एका कुटुंबातील दोन अभिनेत्यांसोबत काम केले. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला, पण दुसऱ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. बॉलीवूडमधील या अभिनेत्रीने अशा दोन हिरोंसोबत काम केले आहे, जे नात्याने मामा–भाचा लागतात. सन 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 700 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता आणि तब्बल 22 पुरस्कारही पटकावले होते.

अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला आपल्या कारकिर्दीत तिन्ही खान (सलमान, शाहरुख आणि आमिर) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ती चर्चेत असतेच.

तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून केली. यात नायक होता शाहरुख खान. पहिल्याच चित्रपटातून अनुष्काने टॉप हिरोईनचा दर्जा मिळवला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही आणि हिट–सुपरहिट–ब्लॉकबस्टर चित्रपटांची मालिकाच लावली.

आपल्या करिअरमध्ये अनुष्काने एका कुटुंबातील दोन कलाकारांसोबत काम केले आहे – इमरान खान आणि आमिर खान. हे दोघे नात्याने मामा–भाचा आहेत. अनुष्काची इमरान खानसोबतची फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली, मात्र आमिरसोबतचा चित्रपट गल्ल्याच्या बाबतीत सुपरहिट झाला.

तिने इमरान खानसोबत 'मटरू की बिजली का मन डोला' या चित्रपटात काम केले. विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला. यात अनुष्का आणि इमरानने रोमॅन्सही केला होता. चित्रपटाबद्दल बराच गाजावाजा झाला होता, पण रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तो कोसळला. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जागतिक स्तरावर 62.89 कोटींचा व्यवसाय केला आणि फ्लॉप ठरला.

पुढच्या वर्षी सुपरस्टार आमिर खानसोबत अनुष्काची पीके प्रदर्शित झाली. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला आणि अनेक पुरस्कार मिळवले. 2014 मध्ये आलेल्या पीके ने भारतात 473.33 कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केलं, तर जगभरात एकूण कमाई 769.89 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या चित्रपटाने 22 पुरस्कार जिंकले. आयएमडीबीवर पीके ला 8.1 रेटिंग मिळाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mohammed Rafi Son Shahid Accuses Asha Bhosle: 'लता मंगेशकर, आशा भोसले दोन्ही बहिणी माझ्या वडिलांवर जळायच्या...'; मोहम्मद रफी यांच्या मुलाचा खळबळजनक दावा