Bollywood Celebrity On Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमधील (Ahmedabad) अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं (Air India Plane Crash) कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय. तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 10 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण जग हळहळलं. अशातच सिनेविश्वातूनही अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सलमान खाननं आपला शो रद्द केला. तसेच, अभिनेता अक्षय कुमार यानंही 'कन्नप्पा' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द केला. तर जान्हवी कपूर, अक्षय कुमार, सोनू सूद, आमिरा खाननंही पोस्ट करुन मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.  अली गोनीने या घटनेला हृदय पिळवटून टाकणारी बातमी असं म्हटलं आहे. 

भाईजानचा कार्यक्रम रद्द 

सलमान खाननंही अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आपल्या संवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रम जाहीर करत असल्याचं जाहीर करत म्हटलं की, "आज खूप दु:खद घटना घडली. हा सर्वांसाठी दुःखद काळ आहे. ISRL आणि सलमान खान या कठीण काळात देशासोबत उभे आहेत. हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, कारण ही वेळ कोणतेही सेलिब्रेशन करण्याची नाही. आम्ही देशासोबत आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रति आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत." 

मन खूप दुःखी झालंय : शाहरुख खान 

अभिनेता शाहरुख खान यानेही सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं. त्यानं ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "अहमदाबादमधील अपघाताची बातमी ऐकून मन खूप दुःखी झाले आहे... मी पीडितांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रभावित झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो."

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानदेखील याप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसकडून इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पीडितांचे कुटुंबीय आणि जखमी व्यक्तींप्रति त्यानं संवेदना व्यक्त केल्या आहेत.

रितेश देशमुख काय म्हणाला? 

गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलंय. यासंदर्भात रितेशनं ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. 

रितेश देशमुखनं X (ट्विटर) वर लिहिलंय की, "अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची बातमी ऐकून मी खूप दुःखी आणि स्तब्ध झालो आहे. माझ्या संवेदना सर्व प्रवासी, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो." 

दिशा पाटनीनं व्यक्त केला शोक 

अभिनेत्री दिशा पाटनीनं या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तिनं सोशल मीडियावर शोक व्यक्त करत लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. "जखमी असतील त्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी आशा आहे. या दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.", असंही ती म्हणाली आहे. 

अभिनेता अली गोनीनंही या घटनेवर दुःख व्यक्त केलं. त्यानं लिहिलंय की, "एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची दुःखद बातमी. प्रवासी, क्रू आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी प्रार्थना."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash: टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त, तब्बल तीन ट्वीट करत म्हणाले...