Horoscope Today 13 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 13 जून 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज भावंडांकडून सहकार्याची अपेक्षा न ठेवणे चांगले. एखादी गोष्ट सलग सातत्याने करणे थोडे जड जाईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज वाईट यातून चांगले घेण्याची गुणग्राहकता आज ठेवायला हवी, महिला घरातील प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज आरोग्यदायी जीवन जगायचे असेल, तर पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम प्राणायाम यावर भर द्यावा.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा तुमच्या कोमल स्वभावाला कठोर शिस्तीचा बडगा सहन होणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज उत्तम नियोजन करून कामे संपायला हवीत यासाठी जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज घरामध्ये दुरुस्तीची कामे निघतील, त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज केवळ भावनेच्या आहारी जाल तर कर्तव्याचा कळस गाठता येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज दुसऱ्या मधील गुण पाहिले तर मानसिक त्रास कमी होईल महिलांनी स्वतःच्या मनाचा कौल घेणे आवश्यक
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज ज्यांना परदेशागमन करण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य प्रयत्न करावेत प्रवासाचे योग आहेत
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कामे करून घेण्यासाठी पैशाचा उपयोग होऊ शकतो
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य उत्तम मिळेल स्वतःच्या नादात राहिल्यामुळे समोरच्या माणसाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज होतील कामाचा वेळ प्रचंड वाढेल, पूर्वी ध्येयधोरणे ठरवली असतील त्याकडे पोहोचण्याचा मार्ग दिसेल.
हेही वाचा :
Lucky Zodisc Sign: 13 जून तारीख सोनेरी! गजकेसरी योगामुळे 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग, कुबेराची कृपेने तिजोरी भरेल पैशांनी
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)