Chetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं (Air India Plane Crash) AI171 हे ड्रिमलायनर 787 विमान कोसळलं. अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केल्यावर अवघ्या 8 मिनिटांत विमान कोसळलं आणि चक्काचूर झाला. या विमान अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं होतं. मात्र, अवघ्या 8 मिनिटांत 625 फूट उंचीवर असताना हे विमान अहमदाबाद विमानतळालगत असलेल्या मेघानीनगर भागात कोसळलं. अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. त्यापैकी फक्त आणि फक्त एक प्रवासी बचावला असून इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देश हळहळला. सिनेसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. सलमान खान, अक्षय कुमार, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासर्वांपैकी प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांच्या पोस्टनं मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. चेतन भगत यांनी पोस्ट करत शंका उपस्थित केली आहे. तसेच, यासंदर्भातील अधिक तपशील कारणांसह स्षट करा, असंही सांगितलं आहे.
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी तीन ट्वीट केले आहेत. चेतन भगत यांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, "एअर इंडिया विमानाबद्दल अहमदाबादमधून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. टेकऑफ केल्यानंतर लगेचच असे काहीतरी कसे घडू शकते? आशा करतो की, ही घटना का घडली याच्या कारणासह अधिक तपशीलदेखील समोर येईल."
आणखी एक ट्वीट शेअर करत चेतन भगत म्हणाले की, "प्री मार्केटमध्ये बोईंग आधीच 8 टक्क्यांनी घसरला आहे. मोठ्या प्रमाणात बोईंगच्या प्री ऑर्डर देण्यात आल्या होत्या.", याशिवाय चेतन भगत यांनी अपघातग्रस्तांसाठी प्रार्थना करणारं ट्वीट केलं, त्यांनी लिहिलंय की, "अहमदाबादमधील दुर्दैवी अपघातानं धक्का बसला. प्रवासी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती प्रार्थना करतो."
दरम्यान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून लंडनच्या गॅटविक विमानतळापर्यंत या विमानाचा प्रवास होणार होता. त्यासाठी विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण क्षमतेनं भरण्यात आल्या होत्या, अशी माहिती समजतेय. अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगालचे नागरिक होते. त्याशिवाय एक कॅनेडिअन नागरिकही या विमानात होता. अशातच विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून फक्त एक प्रवासी बचावला आहे. तर, आतापर्यंत 265 नागरिकांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :