Bollywood Actress Struggle Life: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) आणि तिथल्या चालीरिती हा वेगळाच चर्चेचा विषय. इथे सौंदर्याला किंमत असते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, अशा अनेक अभिनेत्री (Bollywood Actress) आहेत, ज्यांनी सौंदर्याच्या चौकटी मोडून स्वतःला सिद्ध केलं आणि नाव कमावलं. सिनेसृष्टीत नाव कमावण्यासाठी दररोज म्हटलं तरीसुद्धा अनेकजण येतात. पण, कधी कुणाचं नशीब चमकेल सांगता येत नाही. काहींना पहिल्याच प्रयत्नांत यश मिळतं, तर काहीजण प्रयत्न करत राहतात. पण, वरच्या फोटोंत दिसणारी ही चिमुकली पहिली अशी अभिनेत्री आहे, जिनं तिच्या पदार्पणातच बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला. 90 च्या दशकात या अभिनेत्रीचं स्टारडम सर्वोच्च शिखरावर होतं. या अभिनेत्रीनं बॉलिवूडचे तिनही खान्स, सलमान (Salman Khan), शाहरुख (Shah Rukh Khan) आणि आमिरसोबत (Aamir Khan) स्क्रिन शेअर करुन ब्लॉकबस्टर हिट सिनेमे (Block Buster Hit Movies) दिले आहेत.
तिनही खानांसह ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री
आम्ही बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री राणी मुखर्जीबद्दल बोलत आहोत, जिनं पडद्यावर शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खानसोबत हिट सिनेमे दिलेच, पण त्याव्यतिरिक्तही तिचं तिनही खान्ससोबत खास नातं आहे. तिचा जन्म एका प्रसिद्ध फिल्मी कुटुंबात झाला. तरीसुद्धा कधीकाळी तिला तिची लहान उंची आणि काळ्या रंगामुळे नाकारलं गेलं होतं. पण, जेव्हा तिला संधी मिळाली, त्यावेळी तिनं स्वतःला सिद्ध केलं. अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आज ती केवळ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रीच नाहीतर, एका श्रीमंत आणि नामांकीत बॉलिवूड कुटुंबाची सून देखील आहे. राणी मुखर्जीचं लग्न चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांच्याशी झालं आहे, ज्यांच्यापासून तिला एक मुलगी आहे.
कधीकाळी सावळा रंग, कमी उंचीमुळे लागलेला करिअरला ब्रेक
राणी मुखर्जी दहावीत असताना सलमान खानचे वडील सलीम यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली, पण अभिनेत्रीच्या वडिलांनी ती ऑफर नाकारली. राणी फिल्म इंडस्ट्रीशी संबंध असलेल्या एका नामांकीत कुटुंबातून येते आणि काजोल, तनिषा मुखर्जी तिच्या चुलत बहिणी आहेत. राणीचे आजोबा, काका, मामा या सर्वांनी कधीकाळी सिनेसृष्टीवर केलं आहे. अशा परिस्थितीत, अनेकांना वाटतं की, राणी मुखर्जीला चित्रपट पार्श्वभूमीचा फायदा देखील मिळाला आहे, पण अभिनेत्रीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप संघर्ष करावा लागला. राणीला तिच्या 5 फूट 2 इंच उंची आणि लूकमुळे अनेक वेळा नकार सहन करावा लागला.
90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री
राणी मुखर्जीनं तिच्या करिअरची सुरुवात बंगाली चित्रपटातून केली. तिनं 'बियर फूल' (1996) चित्रपटात काम केलं, कारण त्यावेळी तिला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नाही. त्यानंतर त्याच वर्षी ती 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटात दिसली आणि तिचं नशीब चमकलं. आदित्य चोप्रा यांना राणी मुखर्जीचं काम खूप आवडलं आणि त्यांनी 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील 'टीना' च्या भूमिकेसाठी तिचं नाव करण जोहरला सुचवलं. मग आदित्यच्या आग्रहास्तव, जेव्हा करणनं राणीचा फोटो पाहिला, तेव्हा त्यानं राणी मुखर्जीला कास्ट करायला नकार दिला. पण, जेव्हा या भूमिकेसाठी ज्यावेळी कुणीच सापडलं नाही, तेव्हा राणीची चित्रपटासाठी निवड करण्यात आली.
दरम्यान, राणी मुखर्जीच्या हिट करिअरबाबत बोलायचं तर, राणी मुखर्जीनं अनेक हिट सिनेमे दिलेत. राणी मुखर्जीनं आमिर खानसोबत 'गुलाम' आणि शाहरुख खानसोबत 'कुछ कुछ होता है' सारख्या हिट फिल्म्स दिल्यात. याव्यतिरिक्त राणी मुखर्जीनं सलमान खानसोबतही अनेक सिनेमे केलेत. त्यापैकी 'चोरी चोरी चुपके चुपके' आणि 'कहीं प्यार ना हो जाए' सारख्या फिल्म्सनी धुमाकूळ घातला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :