मुंबई : मागील दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघात 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे एक जाहिरात. द्रविड म्हणजे एक अतिशय शांत स्वभावाचं व्यक्तिमत्त्वं अशीच त्याची प्रतिमा क्रीडारसिकांच्या मनात घर करुन आहे. याच प्रतिमेला शह देत द्रविडचा रौद्रावतार एका जाहिरातीत पाहायला मिळत आहे. सध्या या जाहिरातीची आणि द्रविडच्या या नव्या आणि काहीशा अनपेक्षित रुपाचीच सर्वत्र चर्चा आहे. 


CSK vs DC, IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार


क्रीडारसिकांपासून चाहत्यांपर्यंत सर्वत्र एक प्रकारे द्रविडचीच दहशत पाहायला मिळत असतानाच आता एका गोंडस चिमुकलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. 'इंद्रनगर की गुंडी हूँ मै...' असं लिहित हा फोटो शेअर करण्यात आल्यामुळं एक प्रकारे या चिमुकलीची गोड दहशतच सध्या पाहायला मिळत आहे. 






बालपणीचा फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधणारी ही अभिनेत्री आहे (Deepika Padukone ) दीपिका पदुकोण. आईनं टीपलेला सुरेख असा फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला. तिनं हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनीच व्यक्त होत या गोंडस 'गुंडी'ची प्रशंसाच केली. 



नेमकं काय आहे जाहिरात प्रकरण? 


क्रिकेटर राहुल द्रविड हा खेळपट्टीवर त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण, 'क्रेड' च्या जाहिरातीसाठी मात्र त्यानं वेगळीच वाट पकडत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याच जाहिरातीच्या शेवटी कारच्या रुफमधून बाहेर येत 'इंद्रनगर का गुंडा हूँ मै....' असं तो आवेगात म्हणताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांसोबतच क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनाही भावला आहे.