मुंबई : आपल्या अनोख्या अभिनय शैलीनं आणि दिलखुलास व्यक्तीमत्त्वानं कलाविश्वात वेगळी स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता (varun dhawan) वरुण धवन यानं आता जीवनाती एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नताशा दलाल (natasha dalal) आणि वरुण धवन यांच्या रिलेशनशिपबाबत नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. मागील बऱ्याच काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांच्या याच खास नात्यात लग्नाचं वळणही आलं आहे.


नव्या वर्षात विवाहबद्ध होणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत वरुण आणि नताशाच्या नावाचाही समावेश होता. त्यातच आता लग्नसराईला उत्साहात सुरुवातही झाली आहे. याच लग्नसराईत आता वरुण- नताशाही एका नव्या नात्यात बांधले जाणार आहेत. 2021 मधील जानेवारी म्हणजे, याच महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलची बुकींग झाल्याचीही माहिती समोर येत आहे. खुद्द वरुण धवन यानंच लग्नासाठीच्या या ठिकाणाची पाहणी केल्याचंही म्हटलं जात आहे. त्याच्या विवाहसोहळ्यासाठी 200 पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार अॅडव्हांस बुकींगपासूनचे सर्व व्यवहारही पूर्ण झाले आहेत. तिथं पाहुण्यांची यादीही तयार आहे, पण नेमका आता या सेलिब्रिटी कपलचा विवाहसोहळा कोणत्या तारखेला पार पडणार आहे, हे मात्र अद्यापही अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही.





IN PICS | वाजत- गाजत लस आली दारात!


केव्हाच पार पडला आहे साखरपुडा


वरुण धवन आणि त्याची फॅशन डिझायनंर मैत्रीण नताशा दलाल यांचा साखरपुडा आधीच पार पडला आहे. हल्लीच अभिनेत्री करीना कपूर खान हिनं तिच्या एका रेडिओ शोमध्ये वरुणची होणारी पत्नी म्हणून संबोधलं होतं. त्यावेळीच ही बाब समोर आली. मागील बऱ्याच काळापासून नताशा आणि वरुण रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्येच ते विवाहबंधनात अडकले जाणार असल्याची चर्चा होती. पण, कोरोनाच्या संकटामुळं हे शक्य होऊ शकलं नाही. पण, आता मात्र खऱ्या अर्थानं ही जोडी नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात सज्ज झाली आहे हे नक्की.