Salman Khan Send Wedding Proposal To Monalisa: प्रयागराजमध्ये (Prayagraj) तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळावा (Mahakumbh 2025) भरला आहे. यासाठी देश-विदेशातून साधू-संतांनी हजेरी लावली आहे. यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. तसेच, महाकुंभला गेलेल्यांच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. कधी कोणती साध्वी व्हायरल होत आहे. तर, कधी कुणी उच्चशिक्षित पण सन्यास घेतलेला संन्यासी व्हायरल होत आहे. याच महाकुंभ मेळाव्यातून एक रुद्राक्ष विकणारी मुलगी व्हायरल झाली, ती तिच्या डोळ्यांमुळे. तिच्या सुंदर डोळ्यांनी अनेकांना वेड लावलंय. 


महाकुंभमधून मोनालिसाचा धक्कादायक VIDEO समोर 


अलिकडेच, महाकुंभ मेळाव्यातून हार आणि रुद्राक्ष विकणारी एक मुलगी चर्चेत आली होती. या मुलीचं नाव मोनालिसा. आता, या मोनालिसामध्ये असं काय खास आहे की, ती इतकी चर्चेचा विषय बनली आहे? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. खरंतर, मोनालिसा तिच्या डोळ्यांमुळे महाकुंभ मेळाव्यात विशेष चर्चेत राहिली. काही लोकांना वाटतं की, मोनालिसाचे डोळे ऐश्वर्या रायसारखे दिसतात, तर काहींना वाटतं की, ते वामिका गब्बीसारखे दिसतात. तसं, मोनालिसाला ऐश्वर्यासारखं व्हायचं आहे.




मोनालिसा होणार सलमान खानची नवरी? 


मोनालिसा इतकी चर्चेत आहे की, तिला सारखं कुणी ना कुणी भेटतंय आणि तिचा इंटरव्यू घेतंय. मोनालिसा म्हणते की, तिला अभिनेत्री व्हायचंय. जर तिला संधी मिळाली तर, ती अभिनेत्री होईल. अलिकडेच, आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक युट्यूबर तिला विचारतोय की, तुम्हाला अलिकडेच एका फिल्मस्टारकडून लग्नाची ऑफर आली आहे का? तर यावर मोनालिसा म्हणते, हो सलमान खान. मोनालिसाचं उत्तर ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं आहे की, लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय-काय करू शकतात. 


मोनालिसा सलमान खानसोबत काम करू इच्छिते. युट्यूबर विचारते की तिला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल का? मोनालिसा याला हो म्हणते. बरं, मी तुम्हाला सांगतो की, हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. या व्हिडीओमध्ये YouTuber चा प्रश्न आणि त्यावर मोनालिसानं दिलेलं उत्तर एडिट केलेलं आहे. त्याचबरोबर, काही लोक या व्हिडीओला खरं मानून त्यावर कमेंटही करत आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, अरे भाऊ, सलमान खान तुझ्याशी लग्न का करेल? तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही बोलू लागले आहेत.