Bollywood Actor Life Story: बॉलिवूड स्टार्स (Bollywood Actors) आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांना बरंच कुतुहल असतं. ते खातात काय? ते घरात कसे राहतात? त्यांची शाळा कोणती, त्यांचं कॉलेज कोणतं? असे अनेक प्रश्न आपल्या आवडत्या स्टारबाबत चाहत्यांना पडलेले असतात. तसेच, अनेकदा सोशल मीडियावरही स्टार्सचे लहापणीचे काही जुने फोटो व्हायरल होत असतात, या फोटोमध्ये त्यांना ओळखणही कठीण असतं. असाच एक फोटो आम्हाला सापडला आहे. या फोटोमध्ये बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूर यांच्यासोबत एक बालकलाकार दिसतोय. जर तुम्हाला 80 किंवा 90 च्या दशकातील सिनेमे पाहिले असतील, तर तुम्ही नक्कीच सांगू शकाल की, या फोटोमध्ये दिसतोय तो बालकलाकार कोण आहे?
अनिल कपूरसोबत दिसणारा हा बाल कलाकार कोण?
'वो 7 दिन ' चित्रपटातील एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो itsmasterraju नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अनिल कपूर फारच तरुण दिसत आहेत, पण त्यांच्याच बाजूला हातात एक ढोलकी घेऊन उभ्या असलेल्या त्या सुपरस्टारला तुम्ही ओळखता का? हा चाईल्ड अॅक्टर अमिताभ बच्चन यांच्यापासून राजेश खन्ना आणि जितेंद्रपर्यंत अनेक मोठ्या स्टार्ससोबत चित्रपटांमध् झळकला आहे. अजुनही तुम्ही ओळखू शकला नाहीत? हा अभिनेता दुसरा, तिसरा कोणी नसून गेल्या 70 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणारा 'मास्टर राजू' (Master Raju) आहे. त्यांचं खरं नाव राजू श्रेष्ठ, पण इंडस्ट्रीत सगळे त्यांना 'मास्टर राजू' म्हणूनच ओळखायचे. मास्टर राजू यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'मास्टर राजू' कोण?
'मास्टर राजू'चं खरं नाव फहीम अजानी आहे, त्यांनी 1970 मध्ये चाईल्ड अॅक्टर म्हणून इंडस्ट्रीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 मध्ये, वयाच्या पाचव्या वर्षी, ते 'परिचय' या चित्रपटात दिसले, जिथे त्यांचं नाव 'राजू' असं ठेवण्यात आलं. त्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले, ज्यात अमर प्रेम आणि बावर्ची यांचा समावेश होता. 1976 मध्ये, त्यांना 'चिचोर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि 1977 मध्ये, त्यांना 'किताब' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि जितेंद्र यांच्यासह अनेक प्रमुख कलाकारांसोबत काम केलं. 1980 च्या दशकात, ते छोट्या पडद्यावर परतले, चुनौती आणि झी हॉरर शो सारख्या टीव्ही शोमध्ये दिसले. अजूनही 'मास्टर राजू' फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय असून सध्या ते पंजाबी सिनेमांचं दिग्दर्शन करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :