Jeetendra Became Owner Of RS 855 Crores: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र (Actor Jeetendra) यांनी आजवर अनेक अजरामर सिनेमे केले. पण, आता वयाच्या 83 व्या वर्षी एकाच रात्रीत जितेंद्र यांचं नशीब पालटलं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी एकता कपूर आणि तुषार कपूर यांचे वडील आणि दिग्गज अभिनेत्यानं 855 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबानं मुंबईतील अंधेरी येथील एक जमीन 855 कोटी रुपयांना विकली आहे. ही जमीन जपानी कंपनी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सला विकण्यात आली. जितेंद्र यांच्या कुटुंबाच्या दोन कंपन्या, पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून हा करार करण्यात आला. हा करार 29 मे 2025 रोजी रजिस्टर झाला होता आणि त्यात 9,664.68 चौरस मीटर (सुमारे 2.39 एकर) च्या दोन लगतच्या जमिनींचा समावेश आहे. या जमिनीवर सध्या बालाजी आयटी पार्क आहे, ज्यामध्ये तीन इमारती आहेत आणि एकूण बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 4.9 लाख चौरस फूट आहे.
पूर्वी नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सनं ही जमीन खरेदी केली आहे. कंपनी क्लाउड सोल्यूशन्स, होस्टिंग, डेटा व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट यासारख्या तांत्रिक सेवा पुरवते. या करारावर 8.69 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आकारण्यात आली आहे.
प्रमुख व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रांमध्ये वसलेलं अंधेरी आता एक प्रमुख कमर्शियल आणि निवासी केंद्र बनलं आहे. अलिकडेच, बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत आणि त्यांची पत्नी ज्योती हुडा यांनी अंधेरी पश्चिम येथे 10 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केलं, ज्याचा कार्पेट एरिया 1,950 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 2,341 चौरस फूट आहे.
याव्यतिरिक्त एप्रिलमध्ये बॉलिवूड गायिका अलका याज्ञनिक आणि त्यांची मुलगी सायशा कपूरनंही अंधेरी वेस्टमझ्ये ओबेरॉय स्काय हाईट्समध्ये 11.5 कोटी रुपयांचं एक लग्झरी अपार्टमेंट खरेदी केलेलं. या अपार्टमेंटचं एरिया 2,297 चौरस फूट आहे. त्यापूर्वी बॉलिवूड संगीतकार आणि गायक अनु मलिक आणि त्यांची पत्नी अंजू मलिकनं सांताक्रूझ वेस्टमध्ये 14.49 कोटी रुपयांमध्ये दोन अपार्टमेंट विकले होते. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी अंधेरी वेस्टमध्ये 8,429 चौरस फूटांच्या तीन कमर्शियल प्रॉपर्टी 60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
