Bollywood Actor Received 30 Thousand Proposal: 25 वर्षांपूर्वी, एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यानं आठ-दहा नव्हे तर 92 पुरस्कार जिंकले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, धुवांधार कमाई करून अनेक पुरस्कार आपल्या नावावर करणाऱ्या या ब्लॉकबस्टर सिनेमात लीड अॅक्टर एक स्टार कीड होता. ज्यानं या ब्लॉकबस्टर सिनेमातून (Blockbuster Cinema) पदार्पण केलं होतं. या सिनेमाच्या यशानंतर, अभिनेत्याला (Bollywood Actor) एक, दोन नव्हे तब्बल 30 हजार प्रपोजल आले होते. पण, या अभिनेत्यानं सर्वच्या सर्व प्रपोजल धुडकावले आणि एका अभिनेत्याच्या मुलीशी विवाह केला. पण, काही वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान, सध्या हा सुपरस्टार (Bollywood Superstar) त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे.
बॉलीवूड सिनेसृष्टीत असे अनेक सुपरस्टार आहेत, जे त्यांच्या पहिल्या चित्रपटानं रातोरात स्टार झाले आणि नंतर आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी सुपरस्टारचा दर्जा मिळवला. या यादीत प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचं (Hrithik Roshan) नाव आवर्जुन घेतलं जातं. स्टारकीड असलेल्या हृतिकसाठी सुपरस्टार म्हणून नाव कमावण्याचा रस्ता फारसा सोपा नव्हता. हृतिकनं 2000 साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर हृतिकनं आजवर कधीच मागे वळून पाहिलेलं नाही.
डेब्यूच्या 25 वर्षांनंतरही बॉलीवूडमध्ये हृतिक रोशन हव्वा कायम आहे. अनेक उत्तम सिनेमे केलेल्या हृतिकनं चित्रपटसृष्टीत पदार्पण करताच खळबळ उडवून दिली होती. त्याचा पहिली सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानं तब्बल 92 पुरस्कार आपल्या नावावर केले. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर आजवर कधीच मागे वळून पाहिलं नाव. या प्रचंड यशानंतर हृतिक रोशनला 30 हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते.
हृतिक रोशननं 30 हजार प्रस्ताव नाकारले
हृतिक रोशनचे अभिनेता आणि दिग्दर्शक वडील राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिकचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' दिग्दर्शित केला होता. हृतिकच्या विरुद्ध अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होती. हा त्याचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. दोघांनीही त्यांच्या पहिल्याच चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये हृतिकनं खुलासा केला होता की, चित्रपटाच्या यशानंतर त्याला 30 हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते, परंतु त्यानं त्यापैकी एकही स्वीकारला नाही.
अभिनेत्याच्या मुलीशी बांधली लग्नगाठ
हृतिक रोशननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्याच वर्षी त्याचं लग्न झालं. हृतिक स्वतः हिंदू, सुजैन खान मुस्लिम, दोघांचा विवाह त्याकाळी खूप गाजला. सुजैन खान प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खान यांची मुलगी. लग्नानंतर, हृतिक आणि सुजैन यांचा सुखी संसार सुरू होता. दोघांनाही दोन मुलं आहेत. रेहान रोशन आणि रिदान रोशन, अशी त्यांची नावं. पण, 14 वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांच्या सुखी संसाराला नजर लागली. 2014 मध्ये सुझान आणि हृतिकचा घटस्फोट झाला.
12 वर्षांनी लहान सबा आझादला करतोय डेट
घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर, हृतिकच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं. 51 वर्षांचा हृतिक त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हृतिकची गर्लफ्रेंड सबानं 'मुझसे फ्रेंडशिप करोगे', 'शुद्ध शाकाहारी', 'फील्स लाइक इश्क', 'दिल कबड्डी' आणि 'रॉकेट बॉईज' यांसारख्या चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'विक्रम गोखले आव आणायचे...', अभिनेत्री स्मिता जयकर काय काय म्हणाल्या?