Actress Smita Jaykar : 'हम दिल दे चुके सनम'च्या (Hum Dil De Chuke Sanam) आधी मी विक्रमजींबरोबर काम केलंय. माझं त्यांच्याबरोबरचं पहिलं काम म्हणजे... प्रदीप कबरे, मी, विक्रमजी आणि स्मिता तळवळकर.. मला वाटतं जोडी तुझी माझीमध्ये काम केलं. ही आम्ही मराठी मालिका केली होती. तेव्हा माझी आणि विक्रम गोखले यांनी पहिल्यांदा भेट झाली होती. मला त्यांच्याबरोबर काम करताना खूप भीती वाटत होती. मात्र, ते स्ट्रीक्ट नव्हते, ते स्ट्रीक्ट असल्याचा आव आणायचे. विक्रम गोखलेंसारखा माणूस जर सरळ डोळ्याची पापणी खाली न करता बघता राहिला मला कळेचना मी कुठं बघू.. मी नरव्हस होते", असं अभिनेत्री स्मिता जयकर म्हणाल्या. त्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. 

Continues below advertisement

स्मिता जयकर म्हणाल्या, 'हम दिल दे चुके सनम'च्या पूर्वी आम्ही एकत्रित काम केलं होतं. त्यामुळे आमची केमिस्ट्री फार छान झाली. सलमान खान खूप संवेदनशील आहे. नवी अभिनेत्री होती. तिची डान्स स्टेप चुकली. तेव्हा कोरियोग्राफरने तिला फार रागावलं. तेव्हा ती मुलगी रडू लागली. तेव्हा सलमान खान समजून सांगू लागला. दरम्यान, त्यानंतर मला शूटींग सुरु झाल्यानंतर सलमान म्हणाला, तुम्ही फार सुंदर आहात. तेव्हा मी प्रत्युत्तर देताना म्हणते, हो माझे पती देखील हेच म्हणतात. तो सीन लोकांना फार आवडला. 

पुढे बोलताना स्मिता जयकर म्हणाल्या, विक्रम गोखले म्हणजे हिंदीचे अमिताभ बच्चन.. मला त्यांच्याबरोबर काम करताना भीती वाटायची.. मी त्यांच्याबरोबर काम करत असताना नरव्हस झाले. मात्र, त्यांच्याबरोबरचा पहिला शॉट खूप छान झाला. त्यांनी मला सांगितलं चांगला केलास..त्यानंतर मी त्याच्यासोबत...कुछ खोया कुछ पाया केलं.. राजा परदेशी ही मालिका केली.. खूप सिनेमे केले. मी विक्रमजींबरोबर खूप काम केलं होती. म्हणजे 'हम दिल दे चुके सनम'च्या अगोदर... तेव्हा आम्ही एकमेकांना फार छान ओळखत होतो.

Continues below advertisement

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मी रान डुक्कर खाल्लय, पिसई, घोरपड आणि ससाही खाल्लाय; अभिनेत्री छाया कदमचं वक्तव्य चर्चेत

KKR vs PBKS IPL 2025 : कोलकाताविरुद्ध पंजाबने नाणेफेक जिंकली! अजिंक्य रहाणे घेणार बदला, दोन्ही संघात 2-2 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11