Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडचे (Bollywood Actor) महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा इंडस्ट्रीतला प्रवास आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. करियरच्या सुरुवातीला एकापाठोपाठ एक फ्लॉप फिल्म दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं नशीब 'जंजीर' फिल्मनं (Zanjeer Film) पालटलं. त्यानंतर आजतागायत अमिताभ बच्चन यांनी मागे वळून पाहिलं नाही. अल्पावधीतच अमिताभ बच्चन यांचा समावेश बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये (Bollywood Superstar) केला जाऊ लागला. त्यानंतर बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांच्या फिल्म्स पाहिल्यानंतर लोकांच्या चर्चा सुरू झालेल्या की, जर बिग बींना कुणी टक्कर देऊ शकतं, तर तो विनोद खन्ना (Vinod Khanna). पण, तुम्हाला माहितीय का? ऐंशीच्या दशकात एक अभिनेता होता, ज्यानं अमिताभ बच्चन यांना काँटे की टक्कर दिलेली. बिग बींचं स्टारडम पुरतं हादरवून सोडलं होतं. या अभिनेत्याला 'सिंगल स्क्रीनचा रिअल हिरो' (Real Hero Of The Single Screen) असा टॅगही दिला होता.

Continues below advertisement

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हिंदी चित्रपटसृष्टीचा 'डिस्को डान्सर' आहे. मिथुन चक्रवर्ती ग्लॅमरपासून दूर असतील, पण 1980 आणि 90 च्या दशकात त्यांनी असं स्थान मिळवलं, जे आजही सिनेमागृह मालकांना आठवून अभिमान वाटतो. एक काळ असा होता, जेव्हा सिंगल स्क्रीन सिनेमांचा संपूर्ण व्यवसाय मिथुनच्या नावावर चालत असे आणि बऱ्याचदा त्यांना अमिताभ बच्चनपेक्षा मोठा स्टार म्हटलं जायचं.

थिएटर मालकांसाठी मिथुन म्हणजे, 'हिटची हमी'

बिहारमधील सर्वात जुनं थिएटर 'रूपबनी सिनेमा'चे मालक विषेश चौहान यांनी अलीकडेच एका डिजिटल पॉडकास्टमध्ये जुन्या काळाची आठवण करून दिली आणि मिथुन चक्रवर्तींच्या स्टारडमची आठवण करून दिली. मिथुन चक्रवर्ती यांनी कठीण काळात सिंगल स्क्रीन थिएटर कसं जिवंत ठेवलं? याची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले की, "मिथुन एक आख्यायिका आहे, कोणी काहीही म्हणो. एक काळ असा होता, जेव्हा ते आम्हाला दर महिन्याला दोन चित्रपट द्यायचे. मिथुनचा प्रत्येक चित्रपट 100 टक्के ऑक्युपन्सीसह सुरू होत असे. आम्हाला माहीत होतं की, जर तो त्यांचा चित्रपट असेल तर आठवडा नक्कीच चांगला जाईल..."

Continues below advertisement

'लोक त्यांना अमिताभ बच्चनपेक्षा वरचढ मानू लागले...'

ते पुढे  म्हणाले, "जेव्हा बॉलीवूड हळूहळू 'एलिटिस्ट' टप्प्यात जात होतं, तेव्हा मिथुन यांनी चित्रपटांना तळागाळातील पातळीवर ठेवलं. 1985 ते 1990 दरम्यान त्यांनी इतके हिट चित्रपट दिले की, लोक त्यांना अमिताभ बच्चनपेक्षा वरचढ मानू लागले." विशेक चौहान पुढे म्हणाले की, मिथुन इतके मोठे झाले आहेत आणि त्यांनी इतके हिट चित्रपट दिलेत, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं स्टारडम देखील पाहिलं आहे.

मिथुनचं ऊटी मॉडेल

विशेक यांनी मिथुनच्या चित्रपटांच्या अनोख्या व्यवसाय मॉडेलबाबतही सांगितलं. त्यांनी सांगितलं की, बहुतेक चित्रपटांचं चित्रीकरण ऊटीमध्ये झालं होतं. चित्रपटाचा निर्माता राजीव बब्बरसारखे नाव असेल आणि संपूर्ण युनिट कमी खर्चात चित्रपट पूर्ण करेल. विशेकच्या मते, मिथुन त्यावेळी दररोज 1 लाख रुपये फी घेत असे, जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती. आणि त्यांची अट अशी होती की, शुटिंग फक्त ऊटीमध्येच व्हावं. क्रू त्यांच्या स्वतःच्या हॉटेल, मोनार्क हॉटेलमध्ये राहायचं. चित्रपटगृह मालकही उटीला पोहोचायचे.

आजही अॅक्टिव्ह आहे, मिथुन 

मिथुन चक्रवर्ती नुकतेच श्रीमान vs श्रीमती नावाच्या एका रोमँटिक-कॉमडी लीगल ड्रामामध्ये दिसले, हा सिनेमा मे महिन्यात रिलीज झाला होता. याव्यतिरिक्त विवेक अग्निहोत्री यांची बहुप्रतिक्षित फिल्म 'द बंगाल फाइल्स: राइट टू लाईफ'मध्येही मिथुन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Life Story: वयाच्या सत्तरीत जगतोय लग्झरी लाईफ, 131 कोटींच्या बंगल्यात राहतो 'हा' सुपरस्टार; 21 वेळा जिंकलाय फिल्मफेयर अवॉर्ड