Dharmendra First Car Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.  नुकताच धर्मेंद्र यांनी त्यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते चाहत्यांना त्यांनी खरेदी केलेली पहिली गाडी दाखवताना दिसत आहेत. काळ्या रंगाच्या फियेट कारसोबतच्या धर्मेंद्र यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. 

Continues below advertisement


18 हजार रूपयांना खरेदी केली होती ही आलिशान गाडी 
धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या पहिल्या गाडीबद्दल माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांनी ही गाडी 18 हजार रूपयांनी खरेदी केली होती. धर्मेंद्र या व्हिडीओमध्ये म्हणाले, 'नमस्कार मित्रांनो! ही माझी पहिली कार, ही कार मी 18 हजार रूपयांना खरेदी केली होती. त्याकाळी 18 हजार ही मोठी किंमत होती. मी या गाडीला खूप सांभाळून ठेवले आहे. ही गाडी माझ्यासोबत नेहमी राहावी, अशी प्रार्थना तुम्ही सर्वांनी करा.' 


जेव्हा धर्मेंद्र यांनी मंडपात जाऊन मोडलं होतं 'या' अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचं लग्न


 






गाडीसोबत धरम पाजींची आठवण 


काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांनी या गाडीची माहिती देत गाडीची एक आठवण त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती.  धर्मेंद्र यांनी सांगितले होतोस की, त्यांनी या गाडीला सांभाळून ठेवले होते कारण त्यांनी ठरवले होते की जर त्यांचे अभिनय क्षेत्रात करिअर झाले नाही तर ते या कारचा वापर टॅक्सी म्हणून करू शकतील. एका रिपोर्टनुसार धर्मेंद्र हे लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


The Ladykiller : आता लेडी किलरच्या भूमिकेत दिसणार Arjun Kapoor,पोस्टर शेअर करत लिहिले...