Birthday Special | जेव्हा धर्मेंद्र यांनी मंडपात जाऊन मोडलं होतं 'या' अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचं लग्न
सध्या धर्मेंद्र पंजाबमध्ये आपल्या घरात राहून शेती करत आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ते भाज्यांचे फोटोही शेअर करत असतात.
यादरम्यान, त्यांनी पार्ट टाइम जॉब केला. जिथे त्यांना 200 रुपये मिळाले होते. त्यांनी सांगितलं होतं की, ते शाळेत शिकत होते, तेव्हा शाळेतून घरी परतताना ते नेहमी एका पूलाजवळ बसून पुढे काय करणार याबाबत विचार करत असतं.
त्यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये घर नसल्यामुळे त्यांना एका गॅरेजमध्ये राहावं लागलं होतं. ते म्हणाले की, त्यावेळी माझ्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं. परंतु, मनात पैसे कमावण्याची जिद्द नक्कीच होती.
दरम्यान, रिअॅलिटी शो इंडियन ऑयडलच्या सीझन-11 मध्ये जेव्हा धर्मेंद्र गेस्ट म्हणून पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत म्हटलं की, जेव्हा ते मुंबईत आले होते, तेव्हा सुरुवातीला त्यांच्याकडे राहण्यासाठी घरंही नव्हतं.
परंतु, जितेंद्र यांनी संजीव कुमार यांच्या प्रेमाबाबत न सांगता, त्यांचं हेमा यांच्यावर किती प्रेम आहे ते सांगितलं. एवढंच नाहीतर यादरम्यान धर्मेंद्र यांनाही हेमा मालिनी यांच्याशी लग्न करयाचं होतं. जितेंद्र हेमा मालिनी यांना घेऊन चेन्नईला गेले होते आणि तिथे त्यांच्यासोबत लग्न करणार होते. परंतु, हे लग्न थांबवण्यासाठी धर्मेंद्र जितेंद्र यांची तेव्हा गर्लफ्रेंड शोभा यांना घेऊन चेन्नईला गेले आणि त्यांनी ते लग्न रोखलं होतं.
हेमा मालिनी यांच्यावर अभिनेते संजीव कुमार यांचंही प्रेम जडलं होतं. त्यांनी आपल्या प्रेमासंदर्भात सांगण्यासाठी अभिनेते जितेंद्र यांना हेमा मालिनी यांच्याकडे पाठवलं होतं.
बॉलिवूडमधील ड्रिम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सिनेसृष्टीतील अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. त्यामध्ये जितेंद्र यांचाही समावेश होता.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. जिथे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी एकमेकांशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला होता, तर धर्मेंद्र यांनी एकदा हेमा मालिनी यांचं लग्नही मोडलं होतं.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज 85वा वाढदिवस. बॉलिवूडचे हिमॅन म्हणून ओळखले जाणेर धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसरालीमध्ये झाला. त्यांनी आपल्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. परंतु, बॉलिवूडमधील त्यांचा प्रवास फारसा सोपा नव्हता.