बदलापूर : एका कुरियर कंपनीची तब्बल 400 किलो वजनाची तिजोरीच चोरुन नेल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. बदलापूर पोलिसांनी अवघ्या 5 तासातच या गुन्ह्यातील 2 आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार हा दूसरा कोणी नसून या कुरियर कंपनीचा डिलेव्हरी बॉय निघाला आहे. तर त्याचे 3 साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


बदलापूर पश्चिमेला डिलीव्हरी प्रायव्हेट लिमिटिड नावाची कुरियर कंपनी आहे. या कंपनीची तब्बल 400 किलो वजनाची इलेक्ट्रॉनिक लोखंडी तिजोरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या तिजोरीमध्ये तब्बल अडीच लाखाची रोकड होती. विशेष म्हणजे आपण पकडले जाऊ नये म्हणून या चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करताच सर्वात आधी सीसीटीव्हीचे डिव्हिआर देखील चोरूले होते. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या मदतीने अजय सूर्यवंशी व राज उर्फ विशाल मालाकार या 2 आरोपींना अटक केली असून तिजोरीही हस्तगत केली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.


मुंबईत प्रियकराने स्वत:सह प्रेयसीला पेटवलं, दोघांचाही होरपळून मृत्यू


डिलीव्हरी बॉयने आखली योजना
या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार अजय सूर्यवंशी हा सदर चोरी झालेल्या कार्यालयात डिलीव्हरी बॉयचे काम करत होता. त्यानेच इतर आरोपींना तिजोरीबाबत तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत पूर्ण माहिती देऊन चोरी करण्याची योजना आखली असल्याचे समोर आले आहे. तर या गुन्ह्यातील फरार आरोपी जिला उर्फ जीलाजित दुबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.