Black Panther : Wakanda Forever : ‘ब्लॅक पँथर’च्या (Black Panther) चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा  (Black Panther : Wakanda Forever) ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.


ट्रेलरची सुरुवात समुद्राच्या सुंदर दृश्याने होते आणि बॅकग्राऊंडला एक गाणे ऐकू येते. यात अँजेला बॅसेट समुद्राकडे पाहताना दिसत आहे. मग, एक आलिशान राजवाडा दाखवला जातो आणि अँजेला बॅसेटला खुर्चीवर बसवले जाते. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन दिसते, तर एक भावनिक किनार देखील आहे.



चॅडविक बोसमनला श्रद्धांजली


या टीझरद्वारे ब्लॅक पँथरची भूमिका साकारणाऱ्या चॅडविक बोसमन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ऑगस्‍ट 2020 मध्‍ये कोलन कॅन्सरमुळे चॅडविकचे निधन झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचा टीझर काही वेळापूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. त्यात ‘ब्लॅक पँथर’ची झलकही दाखवण्यात आली आहे.


या चित्रपटात राणी रॅमोंडाची व्यक्तिरेखा खूप भावूक झाल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. राणी रॅमोंडाची भूमिका अभिनेत्री अँजेला बॅसेटने साकारली आहे. या ट्रेलरमध्ये, ती भावूक होताना दिसत आहे. ती म्हणते की, 'मी जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राची राणी आहे आणि माझे संपूर्ण कुटुंब गेले आहे. एवढा त्याग पुरेसा नाही का?'


चॅडविक बोसमनच्या आठवणींना उजाळा


मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर’मध्ये सुपरहिरोची मुख्य भूमिका निभावल्यानंतर चॅडविक बोसमनने हॉलिवूडमध्ये खूप मोठं नाव कमावलं. कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर आणि दिग्दर्शक रायन कूग्लर यांच्या 2018 सालच्या फिल्मची जगभरातील कमाई तब्बल 1.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली. अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर आणि अॅव्हेंजर्स : एण्डगेम या दोन चित्रपटातही त्याने ‘ब्लॅक पँथरचं’ पात्र निभावलं. ऑगस्‍ट 2020 मध्‍ये कोलन कॅन्सरमुळे चॅडविकचे निधन झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :


Vivek Agnihotri: राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नावही नाही! दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात...


Entertainment News Live Updates 24 July: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!