Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली होती.
‘महिला दिना’च्या दिवशी बिपाशा बसू पती करण सिंग ग्रोवर आणि कुटुंबासह मुंबईत स्पॉट झाली होती. यादरम्यान अभिनेत्री एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासोबत डिनरचा आनंद लुटताना दिसली. या कौटुंबिक डिनरसाठी, बिपाशाने मोठ्या आकाराचा निळ्या रंगाचा शर्ट ड्रेस परिधान केला होता. यावेळी पती करणसोबत तिने फोटो पोज दिल्या.
पाहा व्हिडीओ :
सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच नेटिझन्सनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. एका चाहत्याने कमेंट केली की, ‘ती निश्चितपणे गर्भवती आहे... मम्मी ग्लोपासून ते मोठ्या आकाराच्या शर्टपर्यंत...’ त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले की, ‘मलाही वाटते, ती गर्भवती आहे.’ एक दोन नव्हे तर अनेक चाहत्यांनी बिपाशा गरोदर असल्याचा अंदाज बांधला आहे.
मात्र, बिपाशाच्या प्रेग्नेंसीची बातमी पहिल्यांदाच चर्चेत आली नाही. बिपाशा आणि करण 2019मध्ये जेव्हा, रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते, तेव्हा अभिनेत्रीच्या लूकने तिच्या गर्भधारणेच्या अफवांना हवा दिली होते. या पार्टीसाठी बिपाशाने राखाडी रंगाच्या लेहेंग्यासह लांब चोली आणि दुपट्टा परिधान केला होता. इंटरनेटवर हे फोटो समोर येताच, चाहत्यांनी असा अंदाज लावला की, बिपाशा गर्भवती आहे आणि ती तिच्या दुपट्ट्याने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले आणि आता त्यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण होत आहेत.
संबंधित बातम्या
- Malaika Arora : 'लोक ढोंगी आहेत'; ट्रोलर्सला मलायकानं दिलं सडेतोड उत्तर
- Bachchan Pandey : अभिषेक बच्चन अन् चंकी पांडेसोबत खास कनेक्शन; असं ठरलं 'बच्चन पांडे' नाव
- JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha