Bigg Boss OTT 3:  'बिग बॉस' (Bigg Boss) हा रिएल्टी शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. छोट्या पडद्यावर 'बिग बॉस'ने आपली हुकूमत गाजवल्यानंतर आता हा शो खास ओटीटीवरही (Bigg Boss OTT 3 ) रिलीज झाला आहे. यंदा बिग बॉस ओटीटीचे हे तिसरे सीझन आहे. 'बिग बॉस' सारख्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांची इच्छा असते. अनेकांना या शोमधील आपण टास्क पूर्ण करू शकतो असे वाटते. 'बिग बॉस'मधील स्पर्धकांची निवडही वैविध्यपूर्ण असते. पण, या स्पर्धकांची निवड होते तरी कशी?


स्पर्धकांच्या निवडीसाठी खास टीम


'बिग बॉस' हा टीव्ही आणि ओटीटीवर लोकप्रिय शो आहे. मात्र, या रिएल्टी शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या निवडीसाठी खास टीम असते. या टीममध्ये चॅनेल आणि प्रोडक्शनची मंडळी असतात. ही टीम एंटरटेन्मेंट रिसर्च करतात. त्याशिवाय या व्यक्ती किती लोकप्रिय आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, आदी सगळी माहिती ही टीम जमा करते.


वादामुळे चर्चेत असलेल्या लोकांवर विशेष लक्ष...






बिग बॉसमध्ये ज्या व्यक्ती  वादांमुळे चर्चेत राहतात अथवा राहिलेले असतात, अशा लोकांवर निवड करणाऱ्या टीमचे लक्ष असते. त्याशिवाय, बेधडकपणे  आपले मुद्दे मांडणाऱ्या लोकांनादेखील 'बिग बॉस'मध्ये स्थान दिले जाते. स्पर्धक निवडीचे काही निकष पूर्ण केल्यानंतर या संभाव्य स्पर्धकांसोबत चर्चा केली जाते. त्यांना अटी मान्य असतील आणि शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्यांना प्रत्येक आठवड्यानुसार मानधन दिले जाते. 






'बिग बॉस ओटीटी 3' मधील स्पर्धक कोण?


'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये  नीरज गोयत, सना मकबूल, लव कटारिया, नावेद शेख उर्फ ​​नाझी, सई केतन राव, पायल मलिक, कृतिका मलिक, अरमान मलिक, पायल मलिक, पौलोमी दास, सना सुलतान, शिवानी कुमारी, चंद्रिका दीक्षित, दीक चौरसिया, विशाल पांडे, रणवीर शौरी, मुनिषा खटवानी हे स्पर्धक आहेत.