Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner Good News: झापुक झुपूक करत बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) 5व्या सिझनचा विनर, सूरज चव्हाणने (Suraj Chavan) प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. रिलस्टार म्हणून सुरु झालेला प्रवास बिग बॉसमध्ये (Bigg Boss Marathi) येऊन फळाला आला.  बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणला खरी प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस हा शो संपल्यापासून ते आतापर्यंत सूरज चव्हाण हा कायम प्रकाशझोतात राहणारा स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरज चव्हाणच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या.  त्यानं लग्न केलं. सूरज चव्हाणच्या घरात लवकरच पाळणार हलणार असल्याची चर्चा आहे. नेमकं खरं काय? हे अद्याप समोर आलेलं नाही.  दरम्यान, अलिकडेच सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एक मोठा खुलासा केला आहे. 'नवीन गुड न्यूज  मिळणार', असं त्यानं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

'लवकरच नवीन गुड न्यूज  मिळणार' सूरज चव्हाणचा बिग बॉसच्या घरात मोठा खुलासा (Suraj Chavan wife pregnancy rumours)

बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणला खरी ओळख मिळाली. सूरज चव्हाणने लग्न केलं. काही दिवसांपासून सूरज चव्हाणची पत्नी प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांच्या आयुष्यात तिसरा येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अद्याप दोघांकडून  अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  त्याच्या चाहत्यांकडून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. 

सूरज चव्हाणचं डिसेंबर महिन्यात लग्न झालं. मामाच्या मुलीसोबत त्यानं लग्न केलं असल्याची माहिती आहे. संजना चव्हाण प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. संजनाचे काही बेबी बंपचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   हे फोटो फेक आहेत की खरे, हे अद्याप समोर आलेलं नाही.  दरम्यान, अलिकडेच बिग बॉसच्या घरात जुने धुरंधर स्पर्धक आले होते.  बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण देखील आला होता. यावेळी त्यानं स्पर्धकांशी गप्पा मारल्या. आपल्या शैलीत डायलॉग सादर केले.   

Continues below advertisement

सूरज चव्हाण स्पर्धकांना चिअर अप करत होता.  दिपाली, तन्वी आणि विशाल यांच्यासोबत गप्पा मारताना सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एक मोठा खुलासा केला.  'तुम्ही बाहेर या, मग तुम्हाला समजेल... तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे', असं सूरज चव्हाण म्हणाला. हे सांगत असताना सूरज चव्हाणच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. ती गुड न्यूज वैयक्तिक आयुष्याच्या संबंधित आहे की, इतर कारण आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.  इतर स्पर्धकांनी त्याला अभिनंदन केलं. यावेळी सूरज लाजला.   दरम्यान, सूरज चव्हाण कोणती गुड न्यूज देणार? संजना प्रेग्नेंट असल्याची चर्चा खरी ठरणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विजेता म्हणून ज्या नावाची चर्चा तोच स्पर्धक OUT? फिनालेच्या काही तास आधीच बिग बॉसच्या घरात काय घडलं?